Dhanshri Shintre
कमी बजेटमध्ये स्कूटर खरेदी करायची असल्यास ₹१ लाखाखाली अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे स्कूटर उत्कृष्ट मायलेज, शक्तिशाली फीचर्स आणि कमी देखभालसह दररोजच्या प्रवासासाठी योग्य आहेत.
होंडा अॅक्टिव्हा ११० तीन प्रकारात उपलब्ध आहे, स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट. सर्वांच्या किंमती ₹१ लाखाखाली असून, स्टँडर्ड ₹८०,९७७, डिलक्स ₹९०,९९६ आणि स्मार्ट ₹९४,९९८ आहेत.
होंडा अॅक्टिव्हा ११० मध्ये १०९ सीसी इंजिन असून, ८,००० आरपीएमवर ७.८ बीएचपी आणि ५,५०० आरपीएमवर ९.०५ एनएम टॉर्क देते. स्कूटरमध्ये ४.२-इंच डिजिटल कन्सोल, कनेक्टेड टेक आणि कीलेस स्टार्ट आहे.
टीव्हीएस ज्युपिटर ₹७७,२९१ (एक्स-शोरूम) पासून उपलब्ध असून, चार प्रकारात येते: ड्रम ₹७७,२९१, ड्रम अलॉय ₹८३,०९१, ड्रम एसएक्ससी ₹८६,६४१ आणि डिस्क ₹९०,४४१.
टीव्हीएस ज्युपिटरमध्ये ११३ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ६,५०० आरपीएमवर ७.९ बीएचपी आणि ५,००० आरपीएमवर ९.८ एनएम टॉर्क देते. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट आहेत.
सुझुकी अॅक्सेस १२५ ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी १२५ सीसी स्कूटर आहे. ती चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे: स्टँडर्ड, स्पेशल, राइड कनेक्ट आणि राइड कनेक्ट टीएफटी एडिशन.
सुझुकी अॅक्सेस १२५च्या स्टँडर्ड एडिशनची किंमत ₹८३,८०० पासून, स्पेशल एडिशन डिस्क ब्रेक ₹९०,५०० पासून, तर राइड कनेक्ट एडिशन डिस्क ब्रेकसह अलॉय व्हील ₹९५,१०० पासून सुरू होते.
टीव्हीएस एनटॉर्क १२५ पाच ट्रिममध्ये उपलब्ध आहे: डिस्क ₹८७,५४२, रेस एडिशन ₹९३,१३२, सुपर स्क्वॉड एडिशन ₹९८,११७, रेस XP ₹९८,७७७, आणि XT ₹१०७,३६२ (एक्स-शोरूम).