Union Budget 2025 Saam Tv
बिझनेस

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार आहेत. त्या आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आजच्या अर्थसंकल्पातून कोणाला दिलासा मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Vishal Gangurde

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचणार आहेत. मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज्यसभेत सादर केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, 'सरकारचा पूर्ण प्रयत्न असेल की, २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचा. अर्थमंत्र्यांचा पूर्ण जोर हा मागील वर्षासारखा उत्पादन क्षेत्र, सामाजिक कल्याण, ग्रामीण भारतावरील अर्थ व्यवस्थेवर असेल. या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेअर बाजार सुरु राहणार

शेअर बाजार शनिवारी बंद असतो. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पामुळे आज शनिवारी शेअर बाजार सुरु राहणार आहे. शेअर बाजारातर्फे या संदर्भात एक सर्कुलर देखील जारी केला आहे. शनिवारी नियमित वेळेत शेअर बाजार सुरु असणार आहे.

निर्मला सीतारामन या १० वेळा अर्थसंकल्प सादर करणारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या रेकॉर्डजवळ पोहोचल्या आहेत. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर १० वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. त्यांनी १९५९ ते १९६४ या वर्षादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी पुढे १९६७ ते १९६९ सालादरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले होते.

बजेटआधी पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Weather : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या IMDचा इशारा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

Jio Recharge: 84 दिवसांचा वॅलिडीटीचा Jio चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज

Bhosari Land Scam : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या, एकनाथ खडसेंना कोर्टाचा झटका

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

SCROLL FOR NEXT