ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१ फेब्रुवारी २०२५ रोजी ११ वाजता भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२५ - २०२६ साठीचे अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
अनेकांना हा प्रश्न पडला असेल की १ फेब्रुवारीलाच का बजेट सादर केला जातो. चला तर जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यानंतर फेब्रवुारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता बजेट सादर केला जायचा. इंग्रज राजवटीत ब्रिटेनमध्ये ११ वाजता बजेट सादर केला जायचा यात भारताच्या बजेटचा पण भाग होता. म्हणून त्याचवेळी भारतात बजेट सादर करण्याची परंपरा सुरु झाली.
1999 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी ११ वाजता केली.
तत्कालीन अर्थमंत्री अरुन जेटली यांनी जुनी परंपरा मोडत पहिल्यांदा १ फेब्रुवारीला बजेट सादर करण्यास सुरुवात केली.
२०१७ पासून केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेट दरवर्षी फेब्रुवारीला महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारीला सादर केला जातो.
१ फेब्रुवारीला बजेट सादर केल्यास सरकारला नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पातील धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
जेव्हा बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला जायचा तेव्हा अर्थसंकल्पातील नवीन धोरणांना लागू करण्यासाठी सरकारला अधिक वेळ लागत होता.