Recharge Offer Pinterest
बिझनेस

Recharge Offer: फक्त ४०० रुपयांत 400GB डेटा, आजच करा रिचार्ज

BSNL Recharge: बीएसएनएलने ९०,००० ४जी टॉवर्स पूर्ण केल्यानंतर नवीन ऑफर आणली आहे. फक्त १ रुपयात १ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे, जाणून घ्या तपशील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेलिकॉम कंपन्या सातत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर्स आणत आहेत. अलीकडेच बीएसएनएलने अशीच एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. फ्लॅश सेल अंतर्गत कंपनी फक्त ४०० रुपयांत ४०० जीबी डेटा देत आहे. मात्र ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या ऑफरचा कसा लाभ घ्यावा आणि किती दिवसांत ही ऑफर संपेल, याची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

देशभरात ९० हजार ४जी टॉवर्स यशस्वीपणे सुरू झाल्याचा आनंद साजरा करत बीएसएनएलने खास ऑफर आणली आहे. फक्त ४०० रुपयांमध्ये ४०० जीबी डेटा देणारी ही ऑफर ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा सेल्फ केअर अ‍ॅपद्वारे घेऊ शकतात. मर्यादित काळासाठी असलेल्या या संधीचा लाभ लवकर घ्या.

बीएसएनएलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार ही ऑफर २८ जूनपासून १ जुलैपर्यंत उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्हाला उद्या (१ जुलै) पर्यंतच संधी आहे. ही ऑफर बीएसएनएल सिमधारकांसाठीच असून, यात फक्त डेटा मिळतो. कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा या प्लॅनमध्ये नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त डेटा हवी असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

बीएसएनएलचा हा ४०० रुपयांचा प्लॅन ४० दिवसांच्या वैधतेसह मिळतो आणि यात ४०० जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर स्पीड ४०kbps वर घसरतो. तुलनेत, एअरटेलचा ४५१ रुपयांचा प्लॅन फक्त ५० जीबी डेटा आणि ३० दिवसांची वैधता देतो. जिओचा ३५९ रुपयांचा प्लॅनही ५० जीबी डेटा आणि ३० दिवस वैध आहे. त्यामुळे बीएसएनएल अधिक डेटा आणि वैधता देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या चिखलदरा नगरपरिषदची निवडणूक रद्द होण्याची शक्यता

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

Today Gold Rate : सोन्याचे भाव अचानक बदलले; एका दिवसात दराने पलटली बाजी; आजचा एक तोळ्याचा भाव किती?

Banarasi Saree : अस्सल बनारसी साडी ओळखण्याच्या ७ ट्रिक्स

SCROLL FOR NEXT