BSNL Postpaid Plan saam Tv
बिझनेस

BSNL पोस्टपेड प्लॅन Jio, Airtel आणि Vi पेक्षा आहे स्वस्त, जाणून घ्या किंमत

BSNL Postpaid Plan: BSNL चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 25GB डेटा, अनलिमिडेट नॅशन, लोकल कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात.

साम टिव्ही ब्युरो

Reliance Jio, Vodafone Idea (Vi) आणि Airtel या सर्व कंपन्यांनी त्यांच्या सर्व प्रीपेड मोबाईल प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या पोस्टपेड प्लॅनच्या किमती 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत आणि जुलै 2024 च्या सुरुवातीपासूनच याचा ग्राहकांना फटका बसला आहे. उदाहरणार्थ, जिओचा मासिक एंट्री-लेव्हल प्लॅन, ज्याची किंमत आधी 155 रुपये होती, आता त्याची किंमत 189 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे Airtel आणि Vi कडून 1GB Per day प्लॅनची ​​किंमत 299 रुपये आहे.

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन

BSNL चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 199 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 25GB डेटा, अनलिमिडेट नॅशन, लोकल कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही पुढील महिन्यासाठी 75GB पर्यंत डेटा वाचवू शकता.

एअरटेल पोस्टपेड प्लॅन

एअरटेलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 40GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. या प्लॅनमध्ये Airtel Xstream ॲप व्यतिरिक्त स्ट्रीमिंग सेवांचे कोणतेही अतिरिक्त फायदे नाहीत.

व्होडाफोन आयडिया पोस्टपेड प्लॅन

Vodafone Idea (Vi) चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 40GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. याव्यतिरिक्त प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. मात इतर OTT सेवांचे फायदे यात मिळत नाही.

जिओ पोस्टपेड प्लॅन

जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 75GB डेटा मिळतो, 200GB पर्यंत डेटा, रोलओव्हरची सुविधा आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar सारख्या OTT सेवांचाही लाभ घेऊ शकता.

टीप : येथे दिलेली सर्व माहिती मोबाईल कंपन्यांच्या वेबसाईटवरून घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT