BSA ने EICMA येथे त्यांची चौथी बाईक लाँच केली आहे. जी आहे नवीन साहसी BSA थंडरबोल्ट. या प्रकारातील मागणी असलेल्या आश्चर्यकारक डिझाइन आणि नवीनतम रायडर तंत्रज्ञानाचे एक आकर्षक संयोजन या बाईकमध्ये आहे. मूळ थंडरबोल्टने टूरिंग आणि ऑफ-रोड क्षमता दिलेली आहे. BSA च्या इतिहासात ‘थंडरबोल्ट’ या नावाला खास ओळख आहे. १९७२ मध्ये बर्मिंगहॅम प्लांटमधून तयार झालेली शेवटची बाइक याच नावाने लाँच झाली होती. तब्बल ५३ वर्षांनी BSA पुन्हा ‘थंडरबोल्ट’ मॉडेलसह बाजारात दमदार पुनरागमन करत आहे.
• बँटम ३५० आणि स्क्रॅम्बलर ६५० ची प्रस्तुती करून केवळ तीनच महिने झाले असतांना सुद्धा BSA चे नवनवीन मॉडेल देणे सातत्याने सुरूच आहे.
• BSA थंडरबोल्ट ही भूतकाळाची आठवण करून देते आणि भविष्यात एक प्रगती देणार आहे. ज्यामध्ये ऑन आणि ऑफ-रोड क्षमता आहेत आणि भरपूर अंतर पार करण्यासाठी याची रचना करण्यात आलेली आहे
• वैशिष्ट्ये: ट्रॅक्शन कंट्रोल, तीन ABS मोड, USD फोर्क्स, मोनो रिअर शॉक, स्लिप आणि असिस्ट क्लच
• उच्च स्तराचा ग्राउंड क्लीयरन्स, प्रबलित बॅश प्लेट आणि इंटिग्रेटेड एक्सोस्केलेटन ऑफ-रोड संरक्षण आणि टिकाऊपणा देतात.
• 334 सीसी सिंगल सिलेंडर, DOHC, लिक्विड-कूल्ड इंजिन, युरो 5+ अनुरूप आणि मोठ्या 15.5 लिटर पेट्रोल टँक
• कुशलतेने केलेले डिझाइन: अॅडजस्टेबल फ्रंट विंडशील्ड आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि USB चार्जिंग
नवीन BSA थंडरबोल्टची प्रस्तुती करून BSA साहसी बाजारपेठेत प्रवेश करण्यास सज्ज आहे. ब्रँडची ही चौथी बाईक असून ती २०२६ च्या मध्यात बाजारात येणार आहे. ती शहरातील रस्त्यांपासून ते रेती, पाऊस, चिखल आणि धूळ खडकाळ रस्ता या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर चालू शकणार आहे. आधुनिक BSA थंडरबोल्ट जवळ आणि दूर दोन्ही ठिकाणी दररोजचा प्रवास आणि आठवड्याच्या शेवटी केले जाणारे साहसी प्रवास यांसाठी योग्य आहे.
याव्यतिरिक्त, त्यामध्ये चांगल्या वॉटर वेडिंग क्षमतेसाठी प्रीलोड अॅडजस्टेबल मोनो शॉक रिअर सस्पेंशन, स्लिप आणि असिस्ट क्लच आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट सुद्धा आहे. कार्यक्षम शक्ती आणि कार्यक्षमता असलेले, उच्च टॉर्क युरो 5+ अनुरूप असलेले ३३४ सीसी लिक्विड-कूल्ड DOHC सिंगल सिलेंडर इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्स आणि मोठ्या इंधन टाकीसह आकर्षक कार्यक्षमता देते जे लांब प्रवासासाठी योग्य आहे. तर अतिरिक्त जागेमुळे मागे बसण्यासाठी आणि सामानासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध होते.
क्लासिक लिजेंड्सची निर्मिती जुन्या मोटारसायकल ब्रँडना पुनरुज्जीवित करण्याच्या आणि आधुनिक काळातील रायडर्सना त्यांचा आनंद घेण्यासाठी परत आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने करण्यात आली. सध्या या क्षेत्रात BSA, जावा आणि येझदी यांचा समावेश आहे. जे मोटारसायकलिंग इतिहासावर मोठा प्रभाव पाडणारे तीन ब्रँड आहेत ज्यांनी सर्वांनी अद्वितीय वैशिष्ट्ये टिकवून ठेवली आहेत.
या वर्षी जुलैमध्ये BSA बँटम ३५० ची सुरुवात झाल्यानंतर, फारच प्रतिक्षेत असणाऱ्या BSA स्क्रँबलर 650 सोबत, ही बाइक लाँच करण्यात आली. दोन्ही मॉडेल्सनी EICMA मध्ये पहिल्यांदाच आपले प्रदर्शन केले आहे. बाजारपेठेत धुमाकूळ घालणारी BSA बँटम ३५० ही आधुनिक काळातील बाईक म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये अनोखी वैशिष्ट्ये आहेत. ही मूळ बँटम बाईकची ओळख आहे ज्याला १९४० च्या दशकात युद्धोत्तर ब्रिटनला पुन्हा एकदा चालना देण्याचे श्रेय देण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.