maruti suzuki eeco features  Saam tv
बिझनेस

१ लाखांत घरी आणा ७ सीटर कार; मायलेज जबरदस्त, काय आहेत फिचर्स? वाचा सविस्तर

maruti suzuki eeco features : ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय बाजारात आला आहे. या कारचे फिचर्स जाणून घ्या.

Vishal Gangurde

मारुती ईको ७ सीटर किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

१ लाख डाऊन पेमेंटमध्ये ७ सीटर कार खरेदी करता येईल

बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कारचा चांगला पर्याय आहे

कुटुंब छोटं असो वा मोठं... तुम्हाला ७ सीटर कारची गरज कधीही पडू शकते. बजेट कमी असल्यास तुम्हाला चांगला पर्याय निवडता आला पाहिजे. जर तुमचा बजेट ६ लाख असल्यास तुम्ही ७ सीटर कार घेऊ शकता. Maruti Suzuki ची Maruti Suzuki Eeco या कारने बाजारात रॉयल एन्ट्री केली आहे.

Maruti Suzuki Eeco ची एक्स- शोरुम किंमत ५.२० लाख रुपये इतकी आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत ७.३५ लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये ५ सीटर, ६ सीटर आणि ७ सीटर कारचा देखील पर्याय आहे.

या Eeco चा लूक जबरदस्त स्टायलिश आहे. या कारची डिझाइन ग्राहकांचा विचार करून करण्यात आली आहे. या कारचा सर्वाधिक उपयोग छोटे व्यापारी आणि व्यावसायिक कामांसाठी होतो. या कारला स्लायडिंग दरवाजा देखील असतो. त्यामुळे कारच्या मागे असलेल्या दरवाजामुळे उतरणे आणि चढणे सोपे जाते. हाय रुफमुळे चांगला हेडरुम मिळतो. कार ७ सीटर असल्याने मोठ्या कुटुंबासाठी चांगली कार आहे.

फिचर्स?

कारमध्ये सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. Maruti Suzuki Eeco मध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग, ABS सोबत EBD, सीट बेल्ट रिमायंडर, स्पीड अलर्ट सिस्टम, रिवर्स पार्किंग सेन्सर आणि इंजिन इम्मोबिलायजर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कारची किंमत असतानाही सेफ्टी फिचर्सवर विशेष लक्ष दिलं आहे.

इंजिन आणि मायलेज

कारमध्ये १.२ लीटरचं पेट्रोल इंजिन मिळते. या व्यतिरिक्त CNG पर्याय देखील उपलब्ध आहे. कमी खर्चात चांगली फायदेशीर ठरणारी कार आहे. पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज २० किमी प्रति लीटर आहे. सीएनजी व्हेरिएंट साधारण २७ किमी प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज मिळतो.

EMI पर्याय देखील उपलब्ध

कार खरेदी करण्यासाठी EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्ही १ लाखांचा डाऊन पेमेंट करून Maruti Suzuki Eeco कार घरी आणू शकता. त्यानंतरची रक्कम EMI स्वरुपात भरता येईल. यामुळे तुमच्या बजेटवरही अधिक परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Makeup Tips: ऑफिससाठी परफेक्ट आणि सिम्पल मेकअप हवा असेल तर या सोप्या ७ टिप्स नक्की फॉलो करा

मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : नेक्सो सेंटरमधील ड्रग्स पार्टीच्या प्रकरणात एकाला अटक

Nail Colours Designs: उन्हाळ्यात नखांचे सौंदर्य वाढवतील 'हे' 5 नेल कलर्स

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला बनणार ५ राजयोग; या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

SCROLL FOR NEXT