Gautam Adani Net Worth in Rupees:  Gautam Adani's Rank in Richest People List - Saam TV
बिझनेस

Gautam Adani: 'सुप्रीम' दिलासा मिळताच गौतम अदानींना अच्छे दिन; जगातील श्रीमंतांच्या यादीत रातोरात उलटफेर

Gautam Adani Net Worth in Rupees: हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळताच अदानी समूहाचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वाढले.

Satish Daud

Gautam Adani Networth jumps

उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी बुधवार सर्वांगीण आनंद घेऊन आला. हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळताच अदानी समूहाचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वाढले. शेअर्समध्ये तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाल्याने गौतम अदानींना अच्छे दिन आले. परिणामी अदानींच्या संपत्तीत घसघशीत वाढ आली असून जगातील श्रीमंतांच्या यादीत रातोरात उलटफेर झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर्सच्या वाढीमुळे अदानींची एकूण संपत्ती देखील ४.०१ अब्ज डॉलर्सने म्हणजेच २,३४,०६,७०,८५,००० रुपयांनी वाढली आहे. यामुळे गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत १४ व्या क्रमांवर पोहचले आहेत. (Latest Marathi News)

सध्या अदानींची संपत्ती ८९.९ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. यावर्षी अदानींच्या निव्वळ संपत्तीत ५.६४ बिलियन डॉलर्सची विक्रमी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

पण जसजसे २०२३ वर्ष संपत आले. तसतशी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत अदानींच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बुधवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.

अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर्स सर्वाधिक ११.६०% वाढ झाला. अदानी टोटल गॅसमध्ये ९.८४%, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ६ टक्के, अदानी पॉवरमध्ये ४.९९%, अदानी विल्मरमध्ये ३.९७%, एनडीटीव्हीमध्ये ३.६६%, अदानी एंटरप्रायझेसमध्ये २.४५%, अदानी पोर्ट्समध्ये १.३९% टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, बुधवारी जगातील टॉप १० श्रीमंतांपैकी ७ जणांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती $७.१३ अब्जने घसरून $२२० अब्ज झाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जेफ बेझोस यांनी १.५७ अब्ज, बर्नार्ड अर्नॉल्ट ५.५० अब्ज, बिल गेट्स १.१७ अब्ज आणि लॅरी एलिसन १.९७ अब्ज डॉलर्स गमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT