Mahindra Thar 5 Door Saam Tv
बिझनेस

Mahindra Thar 5 Door ची बुकिंग सुरू? डिझेल इंजिनसह मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किंमत

Thar 5 Door: Mahindra Thar Armada (5 डोअर) येत्या काही महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही कार कंपनी ऑगस्टमध्ये लॉन्च करणार आहे, असं सांगितलं जात आहे. सूत्रानुसार, नवीन थारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल.

Satish Kengar

Mahindra Thar Armada (5 डोअर) येत्या काही महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही कार कंपनी ऑगस्टमध्ये लॉन्च करणार आहे, असं सांगितलं जात आहे. सूत्रानुसार, नवीन थारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल. हेच इंजिन 3-डोअर थारला पॉवर देते. हे इंजिन एंट्री लेव्हल व्हेरियंटमध्ये दिले जाऊ शकते. भारतात नवीन थार मारुती जिमनी आणि फोर्स गुरखा यांच्याशी स्पर्धा करेल. यातच नवीन थारमध्ये कोणते फीचर्स मिळणार? किती असेल याची किंमत? हे जाणून घेऊ...

इंजिन आणि पॉवर

महिंद्रा थार 3-डोरमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन आहे. जे 117hp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन ट्यून करून 5 डोअर थारमध्ये दिले जाईल. मात्र यामध्ये अधिक पॉवर मिळणार आहे.

याशिवाय महिंद्रा थार 5 डोअरमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय हे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील उपलब्ध असेल. 5 डोअर मॉडेलमध्ये 2WD आणि 4WD पर्याय देखील दिले जाऊ शकतात.

नवीन 5 डोअर थार अधिक सुरक्षित करण्यासाठी यात एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इतर फीचर्सचा समावेश असेल. मात्र यावेळी कंपनी अॅडव्हान्स ADAS (Advanced driver-assistance systems) सिस्टीम देखील यात देऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन महिंद्रा थार 5 डोअरला सिंगल-पेन सनरूफ आणि काढता येण्याजोग्या पॅनल्ससह हार्ड टॉप व्हेरिएंट मिळू शकतो. सध्याच्या थारमध्ये सनरूफची सुविधा उपलब्ध नाही. नवीन थार 5-डोअर सध्याच्या Scorpio-N च्या शिडी-फ्रेम चेसिसवर आधारित असेल, जो सॉलिड स्टीलने बनलेला आहे. म्हणजेच नवीन मॉडेल देखील खूप मजबूत असेल.

बुकिंग सुरू

महिंद्राने अद्याप 'थर 5 डोअर'साठी बुकिंग सुरू केलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, काही डीलर्सने अनधिकृतपणे बुकिंग घेणे सुरू केले आहे. 25,000-50,000 रुपयांपर्यंतच्या बुकिंग रकमेच्या ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत. नवीन थारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 3 लाख रुपयांनी महाग असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

वास्तू शास्त्रानुसार 'या' ३ संकेतांकडे दुर्लक्ष करू नये

SCROLL FOR NEXT