Success Story canva
बिझनेस

Success Story: बॉलिवूड अभिनेत्री असूनही दिली UPSC परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात झाली IPS

Success Story: सिमला प्रसाद बॅलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. पण अभिनेत्री असूनही त्यांनी आयपीएस स्वप्न पूर्ण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुष्यात प्रत्येकजण काहीना काही स्वप्न पाहत असतो. याबरोबर स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो नागरिक खूप मेहनत आणि कठोर परिश्रम करत असतात. आपण आपल्या स्वप्नाबरोबर आयुष्यात अनेक स्पर्धा परीक्षा देत असतो. याबरोबर या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आपले अनेक प्रयत्न देखील सुरु असतात. प्रत्येकालाच आयुष्यात पुढे जायचं असतं. यासाठी प्रत्येक नागरिकाची धडपड सुरु असते.

आयुष्यात वैदकीय किंवा यूपीएससी परीक्षा देणे खूप अवघड असते. यासाठी मनात जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असली तर आपण या स्पर्धा परीक्षा पास करु शकतो. या दोन्ही परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. पण काही नागरिक स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टींचा सामना करतात आणि शेवटी ते यशाच्या शिखरावर पोहचतात. असच एक यश एका बॅलिवूड अभिनेत्रीने मिळवलं आहे. जाणून घेऊया त्यांच्या यशाचा संपूर्ण प्रवास.

बॅलिवूडच्या या अभिनेत्रीचे नाव सिमला प्रसाद आहे. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० मध्ये भोपाळ देशात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना त्यांचे छंद जोपासण्याची आवड होती. सिमला या आपले नृत्य आणि अभिनयाचे छंद जोपासत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असायच्या. सिमला यांच्या घरातील परिस्थतीत चांगली होती. त्यांचे वडील डॅा. भगीरथ प्रसाद एक आयएएस अधिकारी होते. यानंतर त्यांचे वडील खासदार झाले.

सिमला यांच्या शालेय जीवनशैलीबद्दल बोलायचे तर त्या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्टुडंट्स फॉर एक्सलन्स मधून त्यांनी B.Com करुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. हे सर्व करत असताना त्यांनी त्यांची अभिनयाची आवड जोपसली. यानंतर त्यांनी बॅलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. सिमला यांनी बॅलिवूडमध्ये देखील स्वत:ची नवी ओळख निर्माण केली होती.

सिमला यांनी मनाशी जिद्द ठेवून त्यांचे आयपीएस स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्री असून ही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. सिमला यांनी त्यांचे आयपीएस स्वप्न कोचिंगची मदत न घेता पूर्ण केले आहे. घरच्यांच्या पाठिबांमुळे त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करु शकल्या आहेत. सिमला प्रसाद या २०१० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT