बिझनेस

BMW Car Sales: BMW आवडे आम्हाला! ३ महिन्यांत कारच्या मागणीत २१%नी वाढ

BMW Growth: बीएमडब्ल्यूच्या इलेक्ट्रिक वाहन विभागात मोठी वाढ झाली असून कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत ईव्ही विक्रीत तब्बल २४६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

Dhanshri Shintre

जर्मन लक्झरी ऑटोमोबाईल निर्माता बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) विक्रीत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने या कालावधीत ४,२०४ कार विक्री केल्या असून हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी जास्त आहे. जीएसटी दरांमध्ये कपात आणि सणासुदीच्या हंगामात वाढलेली मागणी हे या विक्री वाढीचे मुख्य कारण असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितले की, यावर्षी भारतातील विक्री सुरुवातीच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे आणि दोन अंकी वाढ निश्चित आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ऑगस्टपर्यंत विक्री वाढीचा दर सुमारे ११ टक्के होता. जो सप्टेंबरमध्ये १३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

कंपनीने जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ११,९७८ कार विकल्या आहेत. जे गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्के वाढ आहे. यात ११,५१० बीएमडब्ल्यू ब्रँडच्या तर ४६८ मिनी ब्रँडच्या कारचा समावेश आहे. याशिवाय, मोटारसायकल विभागातही कंपनीने उल्लेखनीय कामगिरी करत या नऊ महिन्यांत ३,९७६ मोटारसायकली विक्री केल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहन विभागात बीएमडब्ल्यूने विक्रमी वाढ साधली आहे. ईव्ही विक्रीत वर्षानुवर्षे २४६ टक्के वाढ झाली असून यंदा आतापर्यंत २,५०९ इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू आणि मिनी कार ग्राहकांच्या हाती पोहोचल्या आहेत. एकूण विक्रीत ईव्हींचा वाटा २१ टक्के झाला आहे. यात आयएक्स१ ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली असून कंपनीची फ्लॅगशिप ईव्ही आय७ दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीएमडब्ल्यूने आतापर्यंत भारतात जवळपास ५,००० इलेक्ट्रिक वाहने वितरित केली आहेत.

हरदीप सिंग ब्रार यांच्या मते, विशेषतः मेट्रो शहरांमध्ये चार्जिंग पायाभूत सुविधांचा जलद विस्तार इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत आणखी वाढ घडवून आणेल. त्यांनी सांगितले की, आगामी काही महिन्यांत ईव्ही सेगमेंटमध्ये कंपनीला आणखी मजबूत वाढ अपेक्षित आहे.

एकूणच, बीएमडब्ल्यू इंडियासाठी ही तिमाही विक्री इतिहासातील सर्वोत्तम ठरली आहे. जीएसटी दरातील सवलत, उत्सवी खरेदीचे वातावरण आणि ईव्हींचा वाढता प्रसार यामुळे केवळ कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय लक्झरी कार बाजारासाठीही हा सकारात्मक संकेत मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT