BMC Scheme For Disabled Persons India Mart
बिझनेस

BMC Scheme: दिव्यांगांना मिळणार दरमहा 3 हजारांपर्यंतचे अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Bharat Jadhav

दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका एक योजना राबवत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य' योजना राबवण्यात येणार आहे. सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत दरमहा १ ते ३ हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.

असा करावा अर्ज

महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येताहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलाय. यासाठी संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in

येथे दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९)’ यावर क्लिक केल्यानंतर तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाहीये. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत.

या दिव्यांग बांधवांना मिळणार योजनेचा लाभ

या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल.

दरमहा १ हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित ६ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येतील.म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील.

८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा ३ हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल.

म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील ५ वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT