mukhyamantri mahila rojgar yojana Saam tv
बिझनेस

लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार; पहिला हप्ता २० हजारांचा असणार, जाणून घ्या अटी आणि पात्रता?

mukhyamantri mahila rojgar yojana : लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा २० हजारांचा पहिला हप्ता असेल.

Saam Tv

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार

योजनेची रक्कम ४ टप्प्यांत मिळणार

प्रत्येक टप्प्यात महिलांना स्वतःचे आर्थिक योगदान आवश्यक असणार

बिहारच्या लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर हाती आली आहे. बिहारच्या महिलांना मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १०००० रुपये मिळाले आहेत. आता महिलांना लवकरच २ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

बिहारच्या लाडक्या बहि‍णींना २ लाख रुपये एक खटी मिळणार नाहीत. तर त्यांना ४ टप्प्यात पैसे मिळणार आहेत. या योजनेसाठी काही अटी आणि पात्रता नमूद करण्यात आल्या आहेत. या अटी आणि पात्रता महिलांना पूर्ण कराव्या लागणार आहेत.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. रोजगार किंवा व्यवसाय वाढवण्याची इच्छा मनात असलेल्या महिलांच्या गटाला योजनेचे पैसे मिळतील. महिला ४ जणांचा गट तयार करू शकतात.

एकूण किती टप्प्यात पैसे मिळतील?

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत ४ टप्प्यात एकूण पैसे मिळतील. पहिल्या टप्प्यात २०००० रुपये मिळतील. दुसऱ्या टप्प्यात ४०००० रुपये मिळतील. तिसऱ्या टप्प्यात ८०००० रुपये मिळतील. चौथ्या टप्प्यात ६०००० रुपये मिळतील.

प्रत्येक महिलेला द्यावे लागेल योगदान

व्यवसाय उभारण्यासाठी गटातील महिलांना स्वत:लाही आर्थिक योगदान द्यावे लागतील. महिलांना पहिल्या टप्प्यात स्वत:कडून ५००० रुपये जमा करावे लागेल. दुसऱ्या टप्प्यात १०००० रुपये जमा करावे लागतील. तर तिसऱ्या टप्प्यात २०००० रुपये जमा करावे लागतील. चौथ्या टप्प्यात मार्केटिंग, ब्रँडिग आणि पॅकेजिंगसाठी पैसे जमा करावे लागतील.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी अटी काय?

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी महिलांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. गटात असणाऱ्या महिलांना पैसे मिळतील. महिलांच्या गटाला नियमित बैठक घ्यावी लागेल.

महिलांना गटाच्या बैठकीत नियमित सहभाग घ्यावा लागेल.

गटातील महिलांना दररोज १० रुपयांचं योगदान द्यावे लागेल.

गटातील महिलांना नियमांचं पालन करावं लागेल.

बिझनेस प्लान करावा लागेल.

वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये सहभाग नोंदवावा लागेल.

व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी आढावा घ्यावा लागेल.

महिन्याला एखाद्या छोटीशी एफडी किंवा आरडी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT