Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१००००, नेमकी योजना आहे तरी काय?

Bihar Government Scheme: बिहार सरकारने खास मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना १०,००० ते २ लाख रुपये मिळतात. आज हा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

Siddhi Hande

बिहार सरकारची खास योजना

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेत मिळते आर्थिक मदत

१० हजार ते २ लाखांपर्यंत मिळणार मदत

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्र सरकारनंतर अनेक राज्य सरकारनेदेखील अनेक योजना राबवल्या आहेत.बिहारनेदेखील महिलांसाठी खास मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेत आज महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेत सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे.

या योजनेअंतर्गत सरकार महिलांना १०,००० ते २ लाखांपर्यंतचे लोन देणार आहेत. दरम्यान, आज या योजनेत १०,००० रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आज महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची शक्यता आहे. ५० लाख महिलांच्या खात्यात हे पोसे दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत १.६ कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत. स्वरोजगार वाढवण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सरकार जवळपास ५ कोटी रुपयांचा निधी ट्रान्सफर करणार आहेत.

बिहार सरकारच्या या योजनेत एका कुटुंबातील फक्त एकच महिला अर्ज करु शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला या बचत गटाच्या सदस्या असणे गरजेचे आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असावे. याचसोबत रजिस्टर मोबाईल नंबर अॅक्टिव्ह असावा. तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर तुमच्या फोनवर मेसेज येईल. या योजनेत महिलांना १० ते २ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर ६ महिन्यात तुम्ही व्यवसाय किंवा काम सुरु करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT