Big Rule Changes from September 2025 Saam tv
बिझनेस

LPG ते आधार कार्ड अपडेट; १ सप्टेंबरपासून ८ नियमांमध्ये बदल, सामान्यांच्या खिशावर परिणाम

September 2025: ३० सप्टेंबर २०२५ ही आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख. १४ सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेटची सुविधा. एनपीएसवरून युपीएसवर स्विच करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत.

Bhagyashree Kamble

  • ३० सप्टेंबर २०२५ ही आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख

  • १४ सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेटची सुविधा

  • एनपीएसवरून युपीएसवर स्विच करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

  • एसबीआय क्रेडिट कार्ड पॉइंट्स, चांदी हॉलमार्क, एलपीजी दर व पोस्ट ऑफिस नियमांमध्ये बदल

सप्टेंबर महिन्यापासून पैशांशी संबंधित अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. यामध्ये आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारिख, आधार कार्ड अपडेट, युपीएसमध्ये बदल करण्याची शेवटची तारीख आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियमांचा समावेश आहे. हे बदल वेळेवर जाणून घेणे गरजेचं आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख

ज्यांनी आयकर रिटर्न भरले नाही, त्यांच्यासाठी सरकारने शेवटची तारीख जारी केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपण आयकर रिटर्न भरू शकता. जर तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न भरला नाही तर, तुम्हाला लेट फीस किंवा व्याज भरावे लागेल.

आधार कार्ड अपडेट

युआयडीएआयने आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२५ निश्चित केली आहे. यानंतर, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. जर तुमच्या आधारमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर, तो वेळेत अपडेट करा.

एनपीएसवरून युपीएसवर स्विच करण्याची शेवटची संधी

सरकारने कर्मचाऱ्यांना एनपीएसवरून युपीएसमध्ये स्विच करण्याचा पर्याय दिला आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे. म्हणजेच, जर तुम्हाला नवीन पेन्शन योजना निवडायची असेल तर, तुम्हाला या तारखेपर्यंत फॉर्म भरावा लागेल.

चांदीवरील नवीन नियम

१ सप्टेंबरपासून चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू होईल. आता ग्राहकांना दोन पर्याय असतील, हॉलमार्क नसलेले चांदी किंवा हॉलमार्क असलेले चांदी करू शकतात. बीआयएसने चांदीच्या दागिन्यांसाठी देखील हॉलमार्किंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एफडीच्या नियमांमध्ये बदल

सध्या अनेक बँका विशेष फिक्स डिपॉझिट स्कीम चालवत आहे. ज्यांची शेवटची तारीख सप्टेंबर २०२५ आहे. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला व्याजदार मिळवायचा असेल तर, ३० सप्टेंबरपूर्वी इंडियन बँक किंवा आयडीबीआय बँकेच्या या विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये बदल

१ सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. आता ग्राहकांना प्रत्येक प्रकारच्या खरेदीवर पॉइंट्स मिळणार नाहीत.

इंडिया पोस्टची नवीन नियम

१ सप्टेंबर २०२५ पासून इंडिया पोस्टने एक मोठा बदल केला आहे. आता रजिस्टर्ड पोस्ट नावाची कोणतीही वेगळी सुविधा राहणार नाही. जे काही नोंदणीकृत मेल पाठवले जातात ते आता फक्त स्पीड पोस्टद्वारेच वितरीत केले जातील. यामुळे डिलिव्हरी पूर्वीपेक्षा जलद आणि सोपी होईल.

एलपीजीच्या किमती

एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. यावेळीही १ सप्टेंबर रोजी किमती वाढू किंवा वाढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आमदाराच्या जावयाला आशिया कपसाठी मिळाली संधी, BCCI ने दिली महत्वाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर काळाचा घाला

Maharashtra Politics : राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोठी कारवाई; नगराध्यक्षांसह ६ नगरसेवक निलंबित

Maharashtra Politics: राजकीय खलबतं! राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार; पडद्यामागे काय घडतंय?|VIDEO

Relationship Tips: नातं कसं टिकवायचं? नातेसंबंध मजबूत होण्यासाठी करा 'या' चार गोष्टी

SCROLL FOR NEXT