Home Loan Interest Saam Tv
बिझनेस

सर्वसामान्यांना दिलासा! RBI ने रेपो रेट कमी केल्यानंतर ६ बँकांनी व्याजदरात केली कपात; SBI, HDFC चे व्याजदर जैसे थे वैसे

Home Loan Interest: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर ६ बँकांनी व्याजदरात कपात केली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी करण्याची घोषणा केली. रेपो रेट कमी केल्याने आता बँका कर्जावरील व्याजदरदेखील करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. रेपो रेटवर सर्व बँकाचे व्याजदर ठरवले जाते. दरम्यान ६ बँकांनी व्याजदर कमी केले आहे.

आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे सध्या रेपो रेट ६.२५ % आहे. यानंतर आता कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर कमी केले आहेत.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेने RRLR कमी केले आहे. ते ९.२५ टक्क्यांवरुन ९.०० टक्के करण्यात आले आहे. हे होम लोन संबंधित असते. त्यामुळे आता तुमचे होम लोनवरील व्याजदर कमी होणार आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने आपल्या रेपो लिंक्ड रेटमध्ये बदल केला आहे. ते सध्या ८.९० टक्के केले आहे. १० फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू होणार आहे.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाने RRLR ९.३५ टक्क्यांवरुन ९.१० टक्के केले आहे. हे दर ७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहेत.

यूनियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बँकेने RRLR ०.२५ टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे हे दर ९.२५ टक्क्यांवरुन ९.०० टक्के झाले आहे. हे दर ११ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

इंडियन ओव्हरसीज बँक

इंडियन ओव्हरसीज बँकेने आपल्या RRLR मध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. त्यामुळे हे दर ९.१० टक्के झाले आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेत RRLR मध्ये ०.२५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. हे सध्या ९.२५ टक्क्यांवरुन ९.०० झाले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर अनेक बँकांनी RRLR मध्ये कपात केली आहे. यामुळे गृहकर्जावर कमी व्याजदर आकारले जाणार आहे. त्यामुळे ईएमआयदेखील कमी होईल.

सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने या दरात कोणतेही बदल केलेले नाही. दरम्यान, लवकरच ते व्याजदरात बदल करु शकतात, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT