LPG Gas Cylinder saam tv
बिझनेस

LPG Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा

LPG Gas Cylinder Home Delivery: एलपीजी गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला. आता घरपोच गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे टेन्शन दूर झाले.

Priya More

Summary -

  • एलपीजीच्या नियमात पुन्हा बदल करण्यात आला

  • ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मिळाला दिलासा

  • एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

  • ओटीपी आधारित बुकिंग प्रणाली लागू

  • युद्धामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आता सुरळीत

एलपीजी गॅस सिलिंडरच्या बुकिंगबाबात एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या वितरणात पुन्हा बदल करण्यात आला आहे. वितरकांनी गावांमध्ये पुन्हा एकदा घरपोच वितरण सुरू केले आहे. मार्च महिन्यामध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या वितरण विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना गॅस सिलिंडर घरपोच मिळत नव्हता त्यांना गॅस एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागायच्या. पण आता त्यांना थेट घरपोच सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.

जर तुम्हाला घरपोच गॅस सिलिंडर पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरचा वापर करून त्याचे बुकिंग करावे लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल. एसपीजी सिलिंडर घरी येण्यासाठी या ओटीपीचा वापर केला जाईल. केंद्र सरकारने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, ९९ टक्के एलपीजी सिलिंडरचे बुकिंग ओटीपी आधारित आहेत.

सोमवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एका निवेदनातून असे सांगितले की, कोणत्याही वितरकांकडून सिलिंडरच्या तुटवड्याचे वृत्त नाही. गॅस सिलिंडरचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. १४ एप्रिल रोजी एलपीजीने भरलेला आणखी एक टँकर गुजरातच्या कांडला येथे दाखल झाला. या एलपीजी टँकरने ११ एप्रिल रोजी होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडली होती.

भारतामध्ये सध्या एलपीजीच्या गरजेपैकी ८० ते ८५ टक्के गरज आखाती देशांकडून पूर्ण केली जाते. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा साखळीच मोठा व्यत्यय आला होता. त्यामुळे अनेक भारतीय टँकर सामुद्रधुनी मार्गातच अडकून पडले होते. पण आता युद्ध थांबले आहे त्यामुळे कच्च्या तेलाचे टँकर भारतात येत आहेत. यामुळे भारतात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झाला आहे.

दरम्यान, १ एप्रिल रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण मार्च महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ झाली होती. ५ किलोच्या एफटीएल गॅस सिलिंडरच्या दरातही ५१ रुपयांनी वाढ झाली होती. सध्या ५ किलोचा गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा दाखवणे गरजेचे नाही. ओळखपत्राच्या आधारे तुम्ही गॅस सिलिंडर घरी घेऊन जाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News Live Update: विरारमध्ये धावत्या गाडीला लागली आग

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT