सरकारने १२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करून ५% आणि १८% स्लॅब लागू केले.
हिरो स्प्लेंडर आणि होंडा अॅक्टिव्हा सारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती कमी होणार.
रॉयल एनफिल्डसारख्या ३५० सीसीपेक्षा मोठ्या बाइक्सवर आता ४०% जीएसटी लागू होणार.
ग्राहक आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री दोघांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
सरकारने ५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. १२ आणि २८ टक्क्यांचे दोन टॅक्स स्लॅब रद्द करून आता फक्त दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. ५ टक्के आणि १८ टक्के. हे नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम देशातील लोकप्रिय बाइक्स आणि स्कूटर्सच्या किमतींवर होणार आहे. विशेषत: हिरो स्प्लेंडर आणि होंडा अॅक्टिव्हा सारख्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सच्या किमतीत मोठा बदल दिसून येईल.
सध्या ३५० सीसीपेक्षा मोठ्या इंजिन असलेल्या क्रूझर बाइक्सवर २८ टक्के जीएसटी आणि त्यावर ३ ते ५ टक्के सेस लावला जात होता. यामुळे एकूण कराचा भार ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचायचा. मात्र, नवीन नियमांनुसार आता या बाइक्सवर थेट ४० टक्के फ्लॅट जीएसटी लागू केला जाणार आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्ड सारख्या मोठ्या बाईक्स अधिक महाग होणार आहेत. दुसरीकडे, मध्यम वर्गासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून स्प्लेंडर आणि अॅक्टिव्हा सारख्या बाइक्स आणि स्कूटर्सच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
उदाहरणार्थ, दिल्लीत हिरो स्प्लेंडर प्लसची सध्याची एक्स-शोरूम किंमत ७९,४२६ रुपये आहे. जर जीएसटीत १० टक्क्यांची कपात झाली, तर या बाईकची किंमत जवळपास ७,९०० रुपयांनी कमी होईल. म्हणजेच ग्राहकांना थेट दिलासा मिळेल. सध्या या बाईकच्या किंमतीत आरटीओ शुल्क ६,६५४ रुपये, इंश्योरन्स प्रीमियम ६,६८५ रुपये आणि इतर जवळपास ९५० रुपये जोडले जातात. त्यामुळे तिची ऑन-रोड किंमत दिल्लीत साधारण ९३,७१५ रुपये होते. कर कपातीचा फायदा थेट लागू झाला तर ही किंमत आणखी कमी होईल आणि ग्राहकांना स्वस्तात बाईक घेण्याची संधी मिळेल.
सरकारचा हा निर्णय फक्त ग्राहकांसाठीच फायद्याचा ठरणार नाही, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीलाही मोठी चालना मिळेल. विशेषत: आगामी सणासुदीच्या काळात टू-व्हीलरची विक्री झपाट्याने वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोक नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असतील तर आता त्यांच्यासाठी हा योग्य काळ ठरणार आहे.
नवीन जीएसटी स्लॅब कधी लागू होणार?
२२ सप्टेंबर २०२५ पासून हे नवे दर लागू होतील.
हिरो स्प्लेंडर आणि होंडा अॅक्टिव्हाच्या किंमतीत काय बदल होणार?
जीएसटी कपातीमुळे या बाइक्सच्या किमती स्वस्त होतील.
रॉयल एनफिल्ड सारख्या मोठ्या बाइक्सवर किती टॅक्स लागेल?
३५० सीसीपेक्षा मोठ्या बाइक्सवर आता ४०% फ्लॅट जीएसटी लागेल.
ग्राहकांना याचा फायदा कसा होणार?
मध्यम वर्गीय ग्राहकांना बाईक खरेदी स्वस्तात करता येईल आणि फेस्टिव्ह सीजनमध्ये टू-व्हीलर विक्री वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.