Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळ्याचे दर २१०० रुपयांनी घसरले; आजचा भाव किती?

Gold- Silver Rate Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्यासह चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. वाचा आजचे २४,२२ आणि १८ कॅरेटचे दर...

Priya More

  • ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण.

  • २४ कॅरेट सोनं २१० रुपये प्रती तोळा स्वस्त. १० तोळ्याच्या दरात २,१०० रुपयांची घट.

  • चांदीच्या दरात देखील २,००० रुपयांची घसरण. १ किलो चांदी ₹१,१३,०००.

  • आज सोनं- चांदी खरेदीसाठी उत्तम संधी.

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशामध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी आज चांगली संधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २१० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेटसोबतच २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी किती दर आहेत हे घ्या जाणून...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर २१० रुपयांनी कमी झालेत. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ९९,८२० रुपये खर्च करावे लागणार आहे. पण जीएसटीसह हेच सोनं खरेदीसाठी तुम्हाला १ लाखांपार पैसे मोजावे लागणार आहेत. गुरूवारी याच सोन्यासाठी तुम्हाला १,००,०३० रुपये खर्च मोजावे लागले. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,१०० रुपयांनी घट झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९,९८,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाली. २२ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये २०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९१,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. गुरूवारी हेच सोनं खरेदीसाठी ९१,७०० रुपये द्यावे लागले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर २००० रुपयांनी कमी झालेत. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज ९,१५,००० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे.

१८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज ७४,८७० रुपये खर्च करावे लागतील. गुरूवारी हेच सोनं ७५,०३० रुपयांना विकले गेले. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १६०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ७,४८,७०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर गुरूवारी हेच सोनं खरेदीसाठी तुम्हाला ७,५०,३०० रुपये द्यावे लागले. आज भारतात चांदीचे दर देखील घसरलेत. १ किलो चांदीचे दर २००० रुपयांनी कमी झालेत. १ तोळा चांदी खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१३,००० रुपये द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेची मुंबईत रेकी

SCROLL FOR NEXT