
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले
सोन्याचे दर १० तोळा ४५०० रुपयांची घसरण
सोन्याचे दर आज १ लाखांपेक्षा जास्त
श्रावण महिना सुरु झाला आहे. आता थोड्याच दिवसात सणासुदीला सुरुवात होईल. रक्षाबंधन, नारळीपोर्णिमा असे सण आहेत. या सणांना अनेकजण सोने खरेदी करतात. सोने ही एक गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करे हे फायद्याचे ठरते. परंतु सध्या सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे.
आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate Fall)
आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा ४५० रुपयांनी घसरले आहेत. आज १ तोळा सोन्याचे दर १,००,०३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,०२४ रुपये आहेत. या दरात ३६० रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ४५०० रुपयांनी घसरण झाली आहे.१० तोळ्याचे दर १०,००,३०० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९१,७०० रुपये आहेत. या दरात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ कॅरेट सोन्याचे दर ३२० रुपयांनी घसरले असून हे दर ७३,३६० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ४,००० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९,१७,००० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)
आज १ तोळा सोन्याचे दर ७५,०३० रुपये आहेत. या दरात ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,०२४ रुपये आहेत. या दरात २६४ रुपयांनी घसरण झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,५०,३०० रुपयांनी घसरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.