Aadhaar Offline Saam Tv
बिझनेस

Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Aadhaar Offline KYC : UIDAI ने आधार ऑफलाइन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता OTP किंवा बायोमेट्रिक्सशिवायही आधार व्हेरिफिकेशन करता येणार असून इंटरनेट नसतानाही केवायसी पूर्ण करता येईल.

Namdeo Kumbhar

UIDAI Paperless Aadhaar eKYC Benefits : आधार कार्डशी संबंधित कामांसाठी वारंवार येणारा ओटीपी (OTP) किंवा अंगठ्याचा ठसा (Biometrics) न लागल्यामुळे होणारी चिडचिड आता कायमची संपणार आहे. UIDAI ने सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी 'ऑफलाइन ई-केवायसी' (Aadhaar Offline e-KYC) प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यामुळे आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसली किंवा सर्व्हर डाऊन असला, तरी तुमची केवायसी प्रक्रिया थांबणार नाही.

केवायसीची ही पद्धत फक्त सोपीच नाही तर अत्यंत सुरक्षित असल्याचे UIDAI म्हटले आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर उघड न करताही व्हेरिफिकेशन पूर्ण करता येते. खासगी कंपन्या किंवा टेलिकॉम ऑपरेटर्सना आता तुमची ओळख पटवण्यासाठी वारंवार बायोमेट्रिक्स घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे यापुढे बँक खाते उघडणे असो वा नवीन सिम कार्ड घेणे, आधार ऑफलाइन केवायसीमुळे तुमचे काम अधिक वेगाने आणि विना अडथळा पूर्ण होईल.

Aadhaar Offline KYC, UIDAI eKYC update

कशी काम करते ही प्रोसेस? how to do Aadhaar offline eKYC step by step

या प्रक्रियेला 'पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी' असे म्हणतात. यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून एक झिप फाईल (Zip File) डाउनलोड करावी लागेल. ही फाईल डाउनलोड करताना तुम्हाला स्वतःचा एक 'शेअर कोड' तयार करावा लागतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी केवायसी करायची असेल, तेव्हा तुम्ही ही फाईल आणि तो कोड समोरच्याला देऊ शकता. याद्वारे तुमची सर्व माहिती (नाव, पत्ता, फोटो) सुरक्षितपणे समोरच्या व्यक्तीला मिळते. यात बायोमेट्रिक माहिती कोणाशीही शेअर होत नाही, त्यामुळे डेटा चोरी होणार नाही.

Aadhaar Offline KYC, UIDAI eKYC update

आधार ऑफलाइन केवायसी (Offline KYC) करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी खालील प्रोसस करा..

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट myaadhaar.uidai.gov.in वर जा.

तुमचा आधार नंबर आणि ओटीपी (OTP) वापरून पोर्टलवर लॉगइन करा.

डॅशबोर्ड उघडल्यानंतर खाली स्क्रॉल करा. तिथे तुम्हाला 'Offline e-KYC' चा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता तुमच्या पसंतीचा कोणताही ४ अंकी 'शेअर कोड' (उदा. १२३४) तयार करा. हा कोड तुमच्या फाईलसाठी पासवर्डसारखे काम करेल.

शेअर कोड टाकल्यानंतर 'Download' बटणावर क्लिक करा. तुमच्या फोन किंवा संगणकावर एक .zip फाईल डाउनलोड होईल.

आता तुम्ही एखाद्याला .zip फाईलसोबतच तुम्ही स्वतः तयार केलेला ४ अंकी 'शेअर कोड' सेव्ह करा.. ज्यावेळी कुणी आधार व्हेरिफेकेशन मागेल. त्याला फाईल आणि कोड द्या..

तुमच्या फाईलमध्ये हा कोड टाकून तुमची माहिती व्हेरिफाय करेल आणि तुमची ऑफलाइन केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण होईल.

Aadhaar Offline KYC, UIDAI eKYC update

ऑफलाइन आधार केवायसी (Offline KYC) वापरताना या ३ गोष्टी लक्षात ठेवाच...

तुम्ही तयार केलेला ४ अंकी कोड तुमच्या आधार माहितीची 'चावी' आहे. त्यामुळे हा कोड केवळ विश्वासार्ह आणि अधिकृत ठिकाणीच शेअर करा.

UIDAI कडून डाउनलोड झालेली फाईल .zip फॉरमॅटमध्ये असते. या फाईलचे नाव बदलू नका किंवा तिचा फॉरमॅट (Extension) बदलण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नाही.

ही फाईल कायमस्वरूपी वैध नसते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आणि तांत्रिक कारणांसाठी, जेव्हा केवायसी करायची असेल तेव्हा नवीन फाईल डाउनलोड करणे कधीही चांगले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ऑफिस बॉयचे संतापजनक कृत्य; आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराने तरुणाला फरपटत नेले

Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

Lara Dutta-Akshay Kumar : "दोन तरुण मुलींचा फायदा..."; अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताने केला मोठा खुलासा, २३ वर्षांपूर्वी सेटवर नेमकं काय घडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; ऐन लग्नसराईत ग्राहक हैराण, मुंबईसह तुमच्या शहरातील भाव काय?

SCROLL FOR NEXT