bank strike 2026 meta ai
बिझनेस

Banking News : मोठा निर्णय! या रविवारी बँका सुरू राहणार, ग्राहकांना दिलासा

Bank Customers : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २७ सप्टेंबरला रविवारी बँका सुरू राहणार असून, २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संपामुळे शाखेतल्या व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभराल्या बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत देशव्यापी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) या संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांची आठवड्यातून पाच दिवस कामकाजाची मागणी असून, त्यासाठी हा पंप पुकारण्यात आला आहे.

या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि सलग अनेक दिवस बँकिंग सेवा बंद राहू नयेत, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सामान्यपणे सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे.

२६ आणि २७ सप्टेंबरला साप्ताहिक सुट्टी आणि त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप असल्याने बँकिंग कामकाजावर सलग पाच दिवस परिणाम होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी २७ सप्टेंबरला बँक शाखा, कार्यालये, ATM संबंधित शाखा आणि करन्सी चेस्ट सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून UFBUला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन करण्याल आलं आहे. ग्राहकांना आवश्यक बँकिंग सेवा सुरळीत मिळाव्यात, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला आहे.

कोणत्या सेवांवर परिणाम होऊ शकतो?

२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संपामुळे बँक शाखांमधले प्रत्यक्ष व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये रोख रक्कम जमा करणं किंवा काढणं, चेकशी संबंधित कामं, कागदपत्रं जमा करणं आणि KYCची कामे यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी संपाच्या आधीच बँकेशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करून घेणे योग्य ठरणार आहे. विशेषतः रोख रक्कम, चेक क्लिअरन्स किंवा KYCसारखे प्रत्यक्ष शाखेत करावे लागणारे व्यवहार असतील तर ते वेळेत करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT