LPG Gas Cylinder Rates Today  Saam TV
बिझनेस

LPG Cylinder Price: बजेटपूर्वी महागाईचा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर..

LPG Gas Cylinder Price Today: अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.

Satish Daud

LPG Gas Cylinder Rates Today

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता लोकसभेत यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प असेल. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेल कंपन्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी सिलिंडरचे (LPG Gas Cylinder Price Today) नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार, व्यावसायिक गॅसच्या दरात १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर जानेवारीत देखील व्यावसायिक गॅसचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते.

मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस महागला आहे. त्यामुळे आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

घरगुती गॅस किती रुपयांनी महागला?

एकीकडे व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली असली, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे.

यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती सिलिंडरचे दर बदलले होते. वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १७ वेळा बदल झाला आहे. १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत गॅस सिलिंडरचा दर ११०३ इतका होता. यानंतर, एकाच वेळी तो २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आला.तेव्हापासून आतापर्यंत घरगुती गॅसच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT