stock market  Saam tv
बिझनेस

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करताय? हा व्हिडिओ नक्की बघा

Share Market investment tips : शेअर बाजारात अनिश्चितता दिसत आहे. त्यामुळे अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे, याविषयी भूषण महाजन यांनी सल्ला दिला आहे.

Vishal Gangurde

शेअर बाजारात अनिश्चितता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता असल्याने गुंतणूक कुठे करावी, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोठा फटका भारतालाही बसत आहे. या सर्व बाबींमुळे शेअर बाजारात अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावे, याविषयी विशेषज्ज्ञ भूषण महाजन यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

विशेषज्ज्ञ भूषण महाजन म्हणाले, 'पहिल्या तिमाहीत निकाल चांगले लागले. लोकांना आनंद झाला. भाव वाढले. निफ्टी वाढली. त्यानंतर पुढील तिमाहीत तसं काही झालं नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती मंदावलेली होती. त्याला तज्ज्ञांनी थातुरमातूर कारणे दिली. दुसऱ्या तिमाहीत लोक जागे झाले. २७ सप्टेंबर रोजी निफ्टीने उच्चांक गाठला. सेन्सेक्स ८५ हजारपर्यंत होता. त्यानंतर घसरण सुरु झाली. बाभडी जनता बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूक करते. त्या प्रमाणे गुंतवणूक केल्यानंतरही काही होईना, अशी परिस्थिती दिसली. शेअर बाजाराची घसरण चालूच राहिली'.

'एका बाजूला परदेशी संस्था आहे. त्या संस्था रोज ४-५ हजार कोटींची विक्री करत होते. तिथे देशी गुंतवणूक किती पुरा पडणार. महागाई वाढत होती. व्याजदर वर होते. मध्यमवर्गाला परवडत नव्हतं. वाहन, घर कर्ज महाग झालं. लोकांना खर्चासाठी पैसे उरत नव्हते. लग्नसराईचा काळ येणार आहे. त्यात खरेदीविक्री वाढेल. पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. त्यांना कळालं की पोपट मेला आहे. आपलं कंजम्पशन राष्ट्र आहे. शेवटची तिमाही आली. ऑक्टोबरमध्ये मंदी आली. तेजी किंवा मंदी यामध्ये शेवटचा टप्पा भीषण असतो. शेवटचं पॅनिक ट्रम्प यांनी केलं, असे भूषण महाजन पुढे म्हणाले.

'प्रत्येक कंपनी निकाल जाहीर करते. निकालामुळे बाजार खाली आला. मागच्य वर्षभरात या गोष्टी घडल्या. बाजार आता खाली जाईल, हे विधान मनातून काढा. काल परवाची उसळी सोडा. आता निफ्टी खाली येण्याची शक्यता कमी आहे. शेअर बाजार वर किंवा खाली जाईल. जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कंपन्याच्या निकालानंतर बाजार चाल ठरवेल. आपला जीडीपी खाली येणार असला तरीही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. अमेरिकेच्या टॅरिफमध्ये भारताला झुकतं माप मिळालं. जास्तीत जास्त पदरात पाडून घ्यायला टीम तयार आहे, असे ते म्हणाले.

'संरक्षण सामग्री आयात करायला त्रास नाही. भारत आणि अमेरिकेतील व्यापारातील तूट भरून काढू शकतो. आपण योग्य वाटाघाटी करून योग्य बाबी पदरात पाडू शकतो. आपल्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती ४ लाख ३० हजार कोटी डॉलरची आहे. अमेरिकेची निर्यात ९ ते १० हजार कोटी डॉलर आहे. अमेरिकेचा वाटा आपल्या निर्यातीत बराच असला. तरी त्याचा परिणाम होणार नाही. खनिज तेल प्रत्यक्षात ६५ डॉलरवर आलं आहे. खनिज तेल स्वस्त झालं. त्यानंतर सरकारने उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढवले. यातून सरकारला ३६ हजार कोटी रुपये मिळाले. लाडकी बहीण योजना वगैरे योजना आहेत. त्या योजना परदेशी लोकांना आवडत नाहीत. उत्पादन शुल्कातून मिळणारा पैसा पायाभूत सुविधांवर खर्च केला तर जगाला सकारात्मक संदेश जाईल. यामुळे जागतिक पातळीवर नवनव्या संघटना निर्माण होत आहेत, असेही भूषण महाजन यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT