BHIM App Saam Tv
बिझनेस

आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

BHIM Full Delegation Feature: भीम अॅपने एक नवीन फीचर लाँच केले आहे. भीम फुल डेलिगेशन फीचरमुळे आता तुम्हाला बँक अकाउंटशिवाय पेमेंट करता येणार आहे.

Siddhi Hande

आता बँक अकाउंटशिवाय होणार ऑनलाइन पेमेंट

भीम अॅपचे फुल डेलिगेशन फीचर लाँच

प्रायमरी आणि सेकंडरी युजर्संना करता येणार ऑनलाइन पेमेंट

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. आता आपण कोणतीही वस्तू घेण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करु शकतात.ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे यूपीआय आयडी किंवा बँक अकाउंट असायला हवे. परंतु आता तुम्ही बँक अकाउंट आणि यूपीआय आयडीशिवाय ऑनलाइन पेमेंट करु शकतात. भीम अॅपने यासाठी फुल डेलिगेशन फीचर फीचर लाँच केले आहे.

बँक अकाउंटशिवाय करता येणार ऑनलाइन पेमेंट (Online Payment Without Bank Account)

भीप अॅपच्या नवीन फीचरमुळे लहान मुले, कॉलेजवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे. या नवीन फीचरमुळे प्रायमरी युजर्ससोबत सेकंडरी युजर्सदेखील पेमेंट करु शकतात. या सेकंडरी युजर्सची निवड प्रायमरी युजर्सद्वारे केली जाईल.

भीम अॅपचे फुल डेलिगेशन फीचर आहे तरी काय? (BHIM Full Delegation Feature)

फुल डेलिगशन फिचरमुळे प्राथमिक आणि सेकंडरी युजर्स जोडले जातात. यामुळे दोन्ही युजर्स पेमेंट करु शकतात. या नवीन फीचरमुळे सेकंडरी युजर्स १५००० रुपयांपर्यंतचे पेमेंट करु शकतात.यासाठी लिमिट सेट करण्याची परवानगी प्रायमरी युजर्सकडे असेल. पेमेंटवरचे नियंत्रण हे प्रायमरी युजर्सकडे असेल. या डेलिगेशनचा कालावधी १ महिना ते ५ वर्षांपर्यंत असू शकतो

कोणाला होणार फायदा?

ज्या व्यक्तींचे बँक अकाउंट आणि यूपीआय आयडी नाही हे या फीचरचा लाभ घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांनाही आता फीचरमुळे सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. पालक आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलावर लक्ष ठेवू शकतात. त्यांच्यासाठी ठरावीक खर्चाची मर्यादा सेट करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार; संभाव्य तारीख आली समोर, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra News Live Update: मंत्रालयात दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्यांचा त्रास

LPG, Petrol Price: पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारनं दिली स्पष्ट माहिती

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

SCROLL FOR NEXT