Best Family Car In India  Saam Tv
बिझनेस

Best Family Car: लहान कुटुंबासाठी बेस्ट आहे ही कार, देते 31 किमीचा मायलेज; किंमतही कमी

Mileage Cars: अनेकजण कार घेताना आपल्या कुटुंबियांचा विचार करून कार घेतात. तुम्ही असाच विचार करत असाल आणि तुम्ही 5 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Satish Kengar

Maruti Dzire:

अनेकजण कार घेताना आपल्या कुटुंबियांचा विचार करून कार घेतात. तुम्ही असाच विचार करत असाल आणि तुम्ही 5 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका फाय सीटर सेडान कारबद्दल माहिती सांगणार आहोत. ही कार दिसायला मस्त आणि मायलेजला जबरदस्त आहे.

ही कार आहे मारुती डिझायर. डिझायर ही मारुती सुझुकीची या सेगमेंटमधील लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. Dzire LXi कारचे बेस मॉडेल 6.52 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलमध्ये 1197 सीसी पेट्रोल इंजिन आहे. बेस मॉडेल फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये दिले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनीचा दावा आहे की, ही पेट्रोल कार 22.41 kmpl पर्यंत मायलेज देते आणि ही कार रस्त्यावर 89 bhp पॉवर जनरेट करते. मारुती डिझायरची बूट स्पेस 378 लीटर आहे.   (Latest Marathi News)

सीएनजीमध्ये दोन प्रकार

या कारचे CNG मध्ये दोन प्रकार आहेत, Dzire VXi CNG ची किंमत 8.39 लाख रुपये आणि Dzire ZXi ची किंमत 9.07 लाख रुपये आहे (दोन्ही एक्स-शोरूम). कंपनीचा दावा आहे की, ही कार सीएनजीमध्ये 31.12 किमी/किलो मायलेज देते. कार 76 bhp चा मायलेज जनरेट करते. सीएनजीमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाते. पेट्रोल इंजिनमध्ये कंपनी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देत आहे

Maruti Dzire Car Specifications

  • ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये कारला 2 स्टार रेटिंग मिळाली आहे.

  • ही फाय सीटर कार आहे.

  • मारुती सुझुकी डिझायर चार प्रकारांमध्ये येते.

  • कारमध्ये एलईडी डीआरएल आणि ऑटो फोल्डेबल ओआरव्हीएम देण्यात आले आहेत.

  • यात 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

  • कारमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १५ दिवस!लाडक्या बहिणींनो हे काम लगेच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

LPG Crisis: कुणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात 'रांगा'; जनता बेहाल

Rain Alert : ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार, पुण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होणार, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करणार

SCROLL FOR NEXT