Belated ITR Saam Tv
बिझनेस

Belated ITR: आयटीआर भरायला उशिर केला अन् सरकारची तिजोरी भरली; ६२७ कोटी दंड वसुली

Government earns 627 Crore Rupees from Belated ITR: ज्या करदात्यांनी आयटीआर भरला नाही ते करदाते बिलेटेड आयटीआर भरु शकतात. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीत करदाते आयटीआर भरु शकणार आहे.

Siddhi Hande

आयटीआर (ITR) फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. ३१ जुलैनंतर आयटीआर फाइल केल्यास करदात्यांना दंड भरावा वाहक आहे. मुदतीनंतर आयटीआर भरल्यास त्याला बिलेटेड आयटीआर म्हणतात. बिलेटेड आयटीआर भरण्याची प्रोसेस सुरु झाली आहे.बिलेटेड आयटीआर फाइल करणाऱ्या करदात्यांची संख्या खूप जास्त आहेत. सरकारने आतापर्यंत ६२७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

बिलेटेड आयटीआर भरण्यासाठी १००० ते ५००० रुपयांचा दंड भरावा लागतो. १ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत जवळपास १४ लाखांपेक्षा अधिक करदात्यांनी बिलेटेड आयटीआर फाइल केले आहेत. यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) दंड वसूल केला आहे.

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला दंड भराल लागेल. मिडिया रिपोर्टनुसार, २२ ऑगस्टपर्यंत जवळपास ७.४ कोटी लोकांनी बिलेटेड आयटीआर फाइल केले आहेत. त्यामुळे दंड जमा झाला आहे.

इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ५००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला मुदतीनंतर अर्ज भरण्यासाठी १००० रुपयेदंड द्यावा लागणार आहे. बिलेटेड आयटीआर हा तुम्ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरु शकतात. बिलिटेड आयटीआर भरण्याची प्रोसेस ही आयटीआर भरण्यासारखीच आहे. त्यासाठी करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT