Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! दोनवेळा UPSC मध्ये अपयश, १०० वेळा रिव्हीजन; तिसऱ्या प्रयत्नात IAS होणाऱ्या मीनल करनवाल आहेत तरी कोण?

Success Story of IAS Minal Karanwal: आयएएस मीनल करनवाल यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी नेहमी अभ्यासावर फोकस केले. दिवसरात्र मेहनत करुन त्यांनी हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. कितीही अपयश आले तरीही सतत प्रयत्न करायचे असतात. अपयश काय असतं हे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारावं. अनेकदा १, २ गुणांमुळे आपल्याला परीक्षा पास करता येत नाही. तेव्हा विद्यार्थी खूप खचून जातात. परंतु केलेल्या चुकांमधून सुधारणा करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यश मिळतेच. असंच यश आयएएस मीनल करनवाल यांना मिळालं. (IAS Minal Karanwal Success Story)

मीनल करनवाल या उत्तराखंडच्या देहारादूनच्या रहिवासी आहेत. त्या २०१९ च्या महाराष्ट्र कॅडरच्या ऑफिसर आहेत.

मीनल यांनी सेंट जोसेफ कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सेंट स्टीफेंस कॉलेजमधून घेतले. त्यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी ग्रॅज्युएशननंतर यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली.

मीनल करनवाल यांना दोन अटेंप्टमध्ये अपयश आले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात एनसीईआरटीच्या पुस्तकांवर लक्ष दिले. त्यातून अभ्यास केला. त्यानंतर त्यांना २०१८ मध्ये ३५ रँक मिळाली. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं.

मीनल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी शॉर्ट नोट्सचे जवळपास १०० वेळा रिवीजन केले होते. त्यांनी वारंवार पुस्तके वाचली. त्यांनी आपल्या अभ्यासासाठी वेगळी स्ट्रॅटेजी बनवली होती.याचा त्यांना खूप फायदा झाला. त्या महाराष्ट्रात आयएएस (IAS)म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT