Bank Holiday meta ai
बिझनेस

Bank Holiday: पुढील 10 दिवसांत 6 दिवस बँका बंद; कोणत्या राज्यात कधी? वाचा तारीख

Bank Holidays August 2026: ऑगस्टच्या शेवटच्या १० दिवसांत विविध राज्यांमध्ये ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि धार्मिक सणांमुळे सुट्ट्या आहेत. बँकिंग कामाच्या आधी राज्यनिहाय यादी तपासा.

Sakshi Sunil Jadhav

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या १० दिवसात बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान एकूण ६ दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. मात्र या सर्व सुट्ट्या देशभर एकाच वेळी लागू नसून काही सुट्या राज्यनिहाय आहेत. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असेल तर संबंधित तारखेची आणि आपल्या राज्यातल्या सुट्टीची माहिती आधी तपासणं गरजेचं आहे.

२१ ऑगस्टला देशातल्या कोणत्याही राज्यात बँकांना सुट्टी नाही. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आणि २३ ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.

यानंतर २५ ऑगस्ट रोजी केरळ आणि आंध्र प्रदेशात मिलाद-उन-नबी आणि पहिला ओणम यानिमित्त बँका बंद राहतील. २६ ऑगस्टला महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू -काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये ईद-ए-मिलाद आणि तिरुवोणममुळे बँकांना सुट्टी असेल.

२८ ऑगस्टला रक्षाबंधनानिमित्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील. २७ ऑगस्टला बँका सुरू राहतील. तसेच २९ ऑगस्ट हा महिन्याचा पाचवा शनिवार असल्याने बँका सुरू राहतील, तर ३० ऑगस्टला रविवार असल्यामुळे बँका बंद असतील.

सप्टेंबरमध्येही अनेक सुट्ट्या

सप्टेंबरमध्येही विविध धार्मिक आणि प्रादेशिक सणांमुळे बँकांना सुट्ट्या असतील. ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, १२ सप्टेंबरला आसामध्ये श्रीमंत शंकरदेव तिरुभाव तिथी, तर १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि इतर सणांमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

यानंतर १५,२१,२२,२३ आणि २५ सप्टेंबरलाही विविध राज्यांमध्ये प्रादेशिक सणांनिमित्त बँकांना सुट्टी असेल. बँक हॉलिडे राज्यानुसार बदलतात. त्यामुळे प्रत्यक्ष बँकिंग कामासाठी आपल्या राज्यातल्या आणि संबंधित बँकेच्या सुट्टीची यादी तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

SCROLL FOR NEXT