BOI Recruitment Saam Tv
बिझनेस

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; पगार मिळणार १,२०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Bank Of India Recruitment 2025: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियात स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु

पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

बँकेत नोकरी करण्याची हजारो तरुणांची इच्छा असते. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण सरकारी परीक्षांची तयारी करत असतात. दरम्यान, तुम्हालाही जर सरकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ इंडियाने नवीन भरती जाही केली आहे.

बँक ऑफ इंडियाने विविध विभागांमध्ये भरती जाहीर केली आहे. चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, लॉ ऑफिसर, मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. १७ नोव्हेंबरपासून तुम्ही अर्ज करायचे आहेत.

बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये आयटी, प्रोजेक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, एआय डेव्हलपर, लॉ ऑफिसर्स, मॅनेजर सिविल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण ११५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. २३ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

पात्रता

बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई/बीटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स कम्यूनिकेशन किंवा एमसीए/एमएससी/कंप्यूटर साइंस/आईटीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांच्याकडे Oracle सर्टिफिकेट असावे.याचसोबत अनुभवदेखील विचारात घेतला जाणार आहे.

पगार

बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे. सरकारी बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ६४८२० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारच्या विजयानंतर भाजपची मोठी कारवाई; आमदार, माजी केंद्रीय मंत्र्यांसहित तिघे पक्षातून निलंबित

Famous Artist Death: थराररक! 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रसिद्ध आर्टिस्टचा २९ व्या वर्षी मृत्यू; सिंहाने जबडा खाल्ला

Maharashtra Politics: परिवाराचा नाही तर..., बिहार निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं; मुंबईमध्ये बॅनर वाॅर|VIDEO

Maharashtra Live News Update: मनमाड बायपासवर गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन अखेर मागे

Winter Health Tips: हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये?

SCROLL FOR NEXT