BOB Recruitment Saam Tv
बिझनेस

BOB Recruitment: सरकारी बँकेत नोकरीची संधी; २७०० पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑप बडोदामध्ये २७०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी

२७०० पदांसाठी निघाली भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी अनेकजण खूप आधीपासूनच मेहनत करतात. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल २७०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

फ्रेशर्स असाल तर तुमच्याकडे नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजे ११ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.bank.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

बँक ऑफ बडोदामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती निघाली आहे. कोणीही ग्रॅज्युएट या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. बँक ऑफ बडोदामधील ही भरती देशातील वेगवेगळ्या ब्रँचमध्ये केली जात आहे. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ आहे.

बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ट्रेनिंगचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला १५००० रुपये पगार मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in किंवा nats.education.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. २८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात निवडणुकीची रणधुमाळी, नगरपरिषद - नगरपंचायतींसाठी धुरळा उडाला, कोणामध्ये होणार लढत?

Weight Loss Biryani Recipe: वजन कमी करणारी बिर्याणी! न्यूट्रिशनिस्टने सांगितला हेल्दी फॉर्म्युला, आताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Grated Carrots : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

Ghodbunder Highway: ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार! घोडबंदर महामार्गाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT