Customers rely on bank lockers for gold safety, but recent theft cases have raised serious concerns. saam tv
बिझनेस

बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने चोरीला गेले तर? दागिने परत मिळतात का, बँक नुकसान भरपाई देते का?

Bank Locker Jewellery Theft: जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने चोरीला गेले तर बँक तुम्हाला भरपाई देईल का? नुकत्याच लॉकर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरबीआयचे मार्गदर्शक तत्त्वे, ग्राहकांचे हक्क आणि बँकेच्या जबाबदाऱ्या जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • बँक लॉकर पूर्णपणे जोखीममुक्त नाहीत.

  • बँकेच्या निष्काळजीपणामुळे चोरी झाल्यास भरपाई मिळू शकते.

  • आरबीआयने लॉकर सुरक्षेसाठी स्पष्ट नियम दिले आहेत.

घरात चोरी होऊ नये, आणि घराच्या तिजोरीमधील सोने चोरीला जाऊ नये याासाठी लोक त्यांचे मौल्यवान दागिने बँक लॉकरमध्ये ठेवतात. तुम्हीही असेच करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही ज्या बँक लॉकरला सुरक्षित जागा म्हणत असाल पण ते प्रत्यक्षात तितके सुरक्षित नसू शकते. लखनौ बँकेच्या शाखेतील (IOB) ४२ लॉकरमधून करोडो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्यावेळी जानेवारी २०२६ पर्यंत अनेक ग्राहकांना त्यांच्या वस्तूंपैकी फक्त १०-२५ टक्के वस्तू परत मिळाल्या आहेत.

दुसरी एका घटनेत लखनौमधील दुसऱ्या बँकेच्या माजी व्यवस्थापकानेच ग्राहकाच्या अनुपस्थितीत चार लॉकर फोडून ४८ लाख रुपयांचे दागिने चोरले असा आरोप होतोय. एकीकडे सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यांच्या दरात दररोज वाढ होतेय. अनेकजण सोने सुरक्षित ठिकाणी ठेवतो. त्यामुळे बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवणं खरं सुरक्षित आहे का? दगिने चोरीला गेले तर बँक जबाबदारी घेते का ते जाणून घेऊ. आरबीआय दिलेल्या एका अहवालानुसार, बँकांमधील २० ते ४० टक्के चोरी थेट लॉकरशी संबंधित असतात. तर, जर बँकेतून दागिने चोरीला गेले तर बँक आपल्या ग्राहकांना काही भरपाई देते का? चला तर जाणून घेऊ.

चोरी किंवा आग लागल्यास बँक पैसे देते का?

हो, पण यात एक अडचण आहे. जर नुकसान निष्काळजीपणा किंवा फसवणुकीमुळे झाले असेल तरच बँक जबाबदारी घेत ग्राहकांना पैसे असते.

बँक १०० पट भरपाई देईल

जर चोरी, दरोडा, आग किंवा इमारत कोसळल्यामुळे लॉकरचे नुकसान झाले असेल किंवा कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याने फसवणूक केली असेल तर बँकेला तुम्हाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट भरपाई द्यावी लागते. जर तुमच्या लॉकरचे भाडे दरवर्षी ३,००० असेल, तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त ३,००,००० (₹३,००० x १००) देईल, जरी तुमचे दागिने १० लाख किमतीचे असले तरीही.

नैसर्गिक आपत्ती आल्यास?

जर नैसर्गिक आपत्ती आली तर बँक जबाबदार नसते. जर भूकंप, पूर, वीज कोसळणे किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर बँक कायदेशीररित्या तुम्हाला एक रुपयाही परतफेड करण्यास बांधील नसते. आरबीआयचा असा विश्वास आहे की बँकेचे यावर कोणतेही नियंत्रण नाही.

ग्राहकांनी काय करावे?

लॉकर विमा घ्या:

अनेक विमा कंपन्या आता बँक लॉकर संरक्षण प्लॅन देतात. या खूप परवडणाऱ्या असतात. हे नैसर्गिक आपत्ती आणि चोरी दोन्ही कव्हर करते. बँकेच्या परतफेड मर्यादेव्यतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून काम करतात.

तुमच्या दागिन्यांची यादी आणि फोटो ठेवा:

तुमच्या लॉकरमध्ये काय आहे याची नेहमी नोंद ठेवा. दाव्याच्या वेळी पुरावा देण्यासाठी तुमच्या दागिन्यांचे फोटो आणि त्यांच्या वजनाच्या बिलांचे फोटो काढून ठेवा.

लॉकर भेटीची नोंद:

जेव्हा तुम्ही लॉकर चालवता तेव्हा बँकेच्या रजिस्टरमध्ये नोंद करा आणि लॉकर व्यवस्थित बंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentines Day 2026 Wishes: व्हॅलेंटाईन डे होईल सगळ्यात खास, पार्टनरला द्या मराठी, इंग्रजी आणि हिंदीत शुभेच्छा; Whatsapp अन् सोशल मीडियावर ठेवा स्टेटस

Maharashtra Politics: विलिनीकरणावरून वाद उफाळला! शिंदेंच्या 'त्या' विधानावरून सुनील तटकरे संतापले

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषदमध्ये शिवसेना गटनेते पदी मानसी दळवी यांची निवड

भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर; कुणा कुणाला मिळाली संधी? वाचा

Bhandara : ओव्हरटेक करू शकला नाही; एसटी भररस्त्यात अडवून कारचालकाचा धिंगाणा, VIDEO

SCROLL FOR NEXT