Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays in July: जुलै महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद; सुट्ट्यांची यादी वाचा

Bank Holidays in July 2025: जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. जुलै महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहेत. तुम्हाला बँकेत काही काम असेल तर ही यादी वाचूनच जा.

Siddhi Hande

जून महिना संपायला अवघे २-३ दिवस उरले आहेत. जुलै महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. जुलै महिन्यात बँका अनेक दिवस बंद असणार आहेत.त्यामुळे जर पुढच्या महिन्यात तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघूनच जा. दरम्यान, जुलै महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहे.

जुलै महिन्यात सणासुदीच्या दिवशी, वीकेंडला बँका बंद असणार आहे. या १३ सुट्ट्यांमध्ये चार रविवार, दोन शनिवार आणि इतर ७ दिवस बँका बंद असणार आहे. जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात बँका किती दिवस बंद?

३ जुलै- अगरताळा येथे खर्ची पुजानिमित्त बँका बंद असणार आहे.

५ जुलै- गुरु हरगोविंद सिंह यांच्या जन्मोत्सवानिमित्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहणार आहे.

६ जुलै- रविवारनिमित्त बँका बंद

१२ जुलै- दुसऱ्या शनिवारी बँक बंद असणार आहे.

१३ जुलै-रविवार

१४ जुलै- शिलाँग येथे बेह दीन्खलाम येथे बँका बंद असणार आहे.

१६ जुलै- हरेला सणानिमित्त देहारादून येथील बँका बंद असणार आहे.

१७ जुलै-यू तिरोत सिंह पुण्यतिथीनिमित्त शिलाँग येथे बँका बंद

१९ जुलै- केर पूजा निमितत आगरतळा येथे बँकांना सुट्टी

२० जुलै- रविवार

२६ जुलै-चौथा शनिवार

२७ जुलै-रविवारी बँकांना सुट्टी

२८ जुलै-द्रुक्पा त्से-जीनिमित्त गंगटोक येथे बँका बंद असणार आहे.

ऑनलाइन बँकिंग सुविधा

जुलै महिन्यात शिलाँगमध्ये १२ ते १४ जुलै या कालावधीत ३ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. गंगटोक येथे २६ ते २८ जुलैपर्यंत बँका बंद असणार आहे.जुलै महिन्यात १३ दिवस बँका बंद असल्या तरीही ऑनलाइन सेवा सुरु असणार आहे. जुलै महिन्यात तुम्ही डिजिटल पेमेंट वैगेरे करु शकणार आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची उद्या सकाळी पत्रकार परिषद

Maratha Reservation: भगवं वादळ सज्ज, मराठा आरक्षणाचा मोर्चा २९ ऑगस्टला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटलांचा एल्गार|VIDEO

Shravan 2025: श्रावणात स्वप्नात या गोष्टी दिसल्यास शुभ की अशुभ?

Motion Sickness: प्रवासामध्ये तुम्हालाही उलटीचा त्रास होतो का? मग करा 'हे' सोपे उपाय

Home Loan EMI Tips : Home Loan वर घेतलं घर? हे ५ उपाय करा आणि कर्जाचं टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT