Bank Holiday In February 2024 Saam Tv
बिझनेस

Bank Holiday In February 2024 : फेब्रुवारी महिन्यात ११ दिवस बँका राहाणार बंद, एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

कोमल दामुद्रे

Bank Holidays In February 2024 List :

नवीन वर्षातील दुसऱ्या महिन्यात ११ दिवस बँका बंद राहाणार आहे. गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे अधिक कामेही ऑनलाइन होतात.

परंतु, काही कारणामुळे बँकेत (Bank) जावे लागते. अशा परिस्थितीत बँक कोणत्या दिवशी बंद असते आणि कोणत्या दिवशी उघडते हे जाणून घेणे गरजेचे आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ दिवस बँका बंद (Close) राहाणार आहे. पाहूया त्याची लिस्ट (List)

फेब्रुवारी महिन्यात फक्त १८ दिवस बँका सुरु राहाणार आहे. या महिन्यात सण, जयंती आणि शनिवार-रविवार असे एकूण ११ दिवस बँका बंद राहातील. यामध्ये काही राज्यांसाठीच सुट्टया राहातील.

  • ४ फेब्रुवारी २०२४- रविवार

  • १० फेब्रुवारी २०२४- दुसरा शनिवार

  • ११ फेब्रुवारी २०२४- रविवार

  • १४ फेब्रुवारी २०२४- त्रिपुरा, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये बसंत पंचमी किंवा सरस्वती पूजेमुळे बँका बंद राहतील.

  • १५ फेब्रुवारी २०२४- मणिपूरमध्ये लुई-न्गाई-नीमुळे बँकांना सुट्टी असेल.

  • १८ फेब्रुवारी २०२४- रविवार, देशभरात बँका बंद राहतील.

  • १९ फेब्रुवारी २०२४- छत्रपती शिवाजी महाराज जयंती

  • २० फेब्रुवारी २०२४- मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राज्य दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.

  • २४ फेब्रुवारी २०२४- दुसरा शनिवार

  • २५ फेब्रुवारी २०२४- रविवार

  • २६ फेब्रुवारी २०२४- अरुणाचल प्रदेशात बँकांना न्योकुममुळे सुट्टी असेल.

बँकेत जर काही काम असेल तर या सुट्ट्या नक्की बघून जा. या सुट्ट्यांबरोबरच वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या सणानुसार त्यांना प्रादेशिक सुट्ट्या असणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT