List of Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays: डिसेंबर महिन्यात तब्बल १७ दिवस बँका राहणार बंद; RBIने जाहीर केली सुट्ट्यांची यादी; वाचा

Bank Holidays In December: डिसेंबर महिन्यात बँका १७ दिवस बंद राहणार आहेत. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्टयांची यादी नक्की चेक करुन जा.

Siddhi Hande

डिसेंबर महिना उद्यापासून सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. डिसेंबर महिन्यात बँका तब्बल १७ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जर काही काम असेल तर सुट्ट्यांची ही लिस्ट चेक करुन जा. (Bank Holidays In December)

आजकाल बँकांची अनेक कामे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने होतात. परंतु अनेकदा काही महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जावे लागते. डिसेंबर महिन्यात १७ दिवसात बँदा बंद असणार आहेत. त्यात ५ रविवार असणार आहे.डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि इतर सणांच्या सुट्ट्यादेखील आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यातील बँकांची यादी जाहीर केली आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार विविध राज्यांच्या सणानुसार सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी (December Bank Holidays List)

डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

३ डिसेंबर- सेंट फ्रांसिस जेवियर पर्व

८ डिसेंबर(रविवार)- साप्ताहिक सुट्टी

१२ डिसेंबर (गुरुवार)- पा-तोगन नेगमिंजा संगमासाठी शिलाँगमध्ये बँकांना सुट्टी

१४ डिसेंबर (शनिवार)- महिन्यातील दुसरा शनिवार

१५ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

१८ डिसेंबर- यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार

१९ डिसेंबर- गोवा मुक्ती दिवस आहे त्यामुळे गोव्यात बँका बंद राहणार आहेत.

२२ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

२४ डिसेंबर (मंगळवार)- ख्रिसमसच्या आदल्या दिवशी कोहिमा, आईजॉलमध्ये बँका बंद

२५ डिसेंबर(बुधवार)- ख्रिसमसनिमित्त देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

२६ डिसेंबर (गुरुवार)- ख्रिसमस उत्सवनिमित्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

२७ डिसेंबर(शनिवार)- चौथा शनिवार

२८ डिसेंबर (रविवार)- साप्ताहिक सुट्टी

३० डिसेंबर - यू किआंग नांगबाहनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहणार आहे.

३१ डिसेंबर- न्यू ईयर ईवनिमित्त काही राज्यातील लोक बँक बंद राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT