Bank Holidays  Saam Tv
बिझनेस

Bank Holidays: कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जारी केली सुट्टयांची यादी

Bank Holidays In April 2026: एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. एकूण १४ दिवस बँका बंद असणार आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी.

Siddhi Hande

एप्रिलमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी समोर

१४ दिवस बँका राहणार बंद

रिझर्व्ह बँकेने जारी केली लिस्ट

एप्रिल महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहे. एप्रिलच्या सुरुवातीला बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एप्रिल महिन्यात बँकांना बरेच दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये वीकेंड आणि सणावाराच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेत जायचे असेल तर त्याआधी सुट्ट्यांची यादी तपासा.

१ एप्रिलला देशातील सर्व बँकांना सुट्टी (Bank Holiday on 1st April 2026)

१ एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या दिवशी बँकेचे वार्षिक खाते बंद करण्याच्या कामासाठी बँका बंद असणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत कोणतेही काम होणार नाही. बँकेच्या शाखा खुल्या असतील मात्र सार्वजनिक व्यव्हार होणार नाहीत. फक्त बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बँका खुल्या असणार आहेत.

३ एप्रिलला सुट्टी

३ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरुसह अनेक शहरांमध्ये बँका बंद असणार आहे.

१४ ते १६ यादरम्यान बँकांना सुट्टी

१४ ते १६ या काळात बिहू, विशू, तमिळ नववर्ष सुरु होणार आहे. तसेच आंबेडकर जयंतीमुळे आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडूतील बँका बंद असणार आहेत.

२०-२१ला सुट्टी

२१ आणि २१ एप्रिलला कर्नाटक आणि त्रिपुरामधील काही बँकांना सुट्टी असणार आहे.

या सुविधा राहणार सुरु

बँका जरी बंद असल्या तरीही डिजिटल सेवा सुरु राहणार आहेत. यामुळे यूपीआय, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आँणि एटीएमचा समावेश आहे. या सर्व डिजिटल सेवा सुरु असणार आहे. चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट आणि पासबुकसंबंधित सर्व कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे. त्यामुळे सुट्ट्या बघूनच बँकेत जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

SCROLL FOR NEXT