Bank Holiday News GOOGLE
बिझनेस

Bank Holidays: बँक ग्राहकांनो, लक्ष द्या! महाराष्ट्रात सलग 4 दिवस बँका; जाणून घ्या पूर्ण माहिती

Maharashtra Bank Holiday : महाराष्ट्रात २६ सप्टेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांच्या शाखा बंद राहतील. मात्र UPI, ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि RTGS सेवा ग्राहकांना उपलब्ध राहतील.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही बँकेशी संबंधित कोणताही व्यवहार करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार दिवस बँका बंद राहणार आहेत. २१ ते २७ सप्टेंबर या आठवड्यात देशातले काही राज्ये आणि शहरांमध्ये सण तसेच प्रादेशिक कारणांमुळे बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. मात्र या यादीतल्या २१, २२ , २३ आणि २५ सप्टेंबरच्या सुट्ट्या महाराष्ट्राला लागू होत नाहीत.

महाराष्ट्रातल्या ग्राहकांसाठी या आठवड्यातील महत्वाची सुट्टी २६ सप्टेंबर, शनिवार रोजी आहे. हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने महाराष्ट्रासह देशभरातली बँकांच्या शाखा बंद राहतील. RBIच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.

२१ सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेव जयंती, श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त भुवनेश्वर आणि तिरुवनंतपुरम येथे, २२ सप्टेंबरला कर्मा पूजेनिमित्त रांचीमध्ये, २३ सप्टेंबरला महाराजा हरिसिंहजी जयंतीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये, तर २५ सप्टेंबरला इंद्रजात्रेनिमित्त गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. या सुट्ट्या महाराष्ट्रातील बँक शाखांना लागू नाहीत.

बँक शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि ATM यांसारख्या डिजिटल सेवा वापरता येतील. तसेच RTGS सेवा २४x७x३६५ उपलब्ध असल्याने सुट्टीच्या दिवशीही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर करता येतात. मात्र रोख रक्कम जमा करणे, चेकशी संबंधित कामे, कागदपत्रे जमा करणे बँक अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणे यांसारख्या शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी बँक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्राहकांनी २६ सप्टेंबरची बँक सुट्टी लक्षात घेऊन शाखेतील महत्त्वाची कामे त्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे. शहरनिहाय किंवा शाखानिहाय काही स्थानिक बदल असल्यास संबंधित बँकेचे वेळापत्रक तपासणेही महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT