Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holiday in March कामाची बातमी! मार्चमध्ये ११ दिवस बँका बंद, RBI कडून सुट्ट्यांची यादी जारी

Bank Holiday in March List: मार्च महिन्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहे. सणासुदीचे दिवस आणि वीकेंडला बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहा.

Siddhi Hande

मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

११ दिवस बँका राहणार बंद

सणासुदीच्या दिवशी विविध राज्यातील बँका बंद

फेब्रुवारी महिना संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. त्यानंतर मार्च महिना सुरु होईल. मार्च महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो.आर्थिक वर्षा २०२५-२६चा हा शेवटचा महिना असणार आहे. त्यामुळे पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत.

पुढच्या महिन्यात ज्यांची बँकेत महत्त्वाची कामे असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद असणार आहेत. बँकांच्या सुट्ट्यांची यादी वाचा.

मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday In March List)

१ मार्च-रविवार देशभरातली सर्व बँका बंद

२ मार्च- होलिका दहनामुळे बँकांना सुट्टी

३ मार्च-धुलिवंदनामुळे बँका बंद

४ मार्च- आगरतळा, अहमदाबाद, ऐझवाल, भुवनेश्वर, चंदीगढ, देहारादून, इटानगर, जम्मू, कानपूर, नवी दिल्ली, रायपूर येथे होळीमुळे बँका बंद

१३ मार्च- चपचार कुटमुळे ऐझवालमध्ये बँकांना सुट्टी

१७ मार्च-शब-ए कद्रमुळे बँकांना सुट्टी

१९ मार्च-महाराष्ट्र, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, श्रीनगर, नागपूर, पणजी, विजयवाडा येथे गुडी पाडवा, तेलुगु नववर्ष, पहिली नवरात्री असल्याने बँका बंद

२० मार्च- जम्मू, श्रीनगर, कोची, त्रिवेंद्रम येथे ईद-उल-फित्र (रमजान)/जुमात-उल-विदानिमित्त बँकांना सुट्टी

२१ मार्च- रमजान-ईदनिमित्त बँक बंद

२६ मार्च- रावनवमीमुळे अनेक ठिकाणी बँका बंद असणार असणार आहे.

२७ मार्च- भोपाळ, भुवनेश्वर, गंगटोक, पाटणा, हैदराबाद, विजयवाडा येथे रामनवमीमुळे बँकांना सुट्टी

३१ मार्च-अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, जयपूर, कानपूर,नवी दिल्ली, रांची येथे महावीर जयंतीनिमित्त बँक बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

SCROLL FOR NEXT