FD Interest Rate Saam Tv
बिझनेस

Senior Citizen FD: ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ; FD वर या बँका देताहेत जबरदस्त व्याजदर

FD: प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. ज्येष्ठ नागरिक त्यांचे पैसे एफडीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bank Gives Interest On Senior Citizen FD:

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. अनेकजण सरकारी योजना, एफडी, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. ज्येष्ठ नागरिक त्यांचे पैसे एफडीमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतात. त्यावर निश्चित व्याज मिळते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीमध्ये पैसे गुंतवणे हा खूप चांगला पर्याय आहे. जर तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही बँकामध्ये एफडीमध्ये जास्त व्याज दिले जाते. या बँकामध्ये तुम्ही १ लाख रुपये गुंतवून त्यावर २६ हजार रुपये व्याज मिळवू शकता. (Latest News)

1. बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा बँक तीन वर्षाच्या एफडीवर ७.५ टक्के दराने व्याज देते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकापैकी बँक ऑफ बडोदामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवत असाल तर तीन वर्षात ही किंमत१.२६ लाख रुपये होईल.

2. अॅक्सिस बँक (Axis Bank)

अॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या एफडीवर ७.६० टक्के दराने व्याज देतात. त्यामुळे जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला तीन वर्षात १.२५ लाख रुपये मिळतील.

3. एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक एफडीवर ७.५० टक्के व्याज देतात.

4. कॅनरा बँक

कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. म्हणजेच जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवत असाल तर तीन वर्षांनी २४ हजार रुपये व्याज मिळेल.

5. स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देते.

6. बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्क्यांनी व्याज देतात.

7. इंडियन बँक

इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या एफडीवर ६.७५ टक्के दराने व्याज देते. म्हणजेच एक लाख रुपये गुंतवल्यावर ३ वर्षांनी तुम्हाला १ लाख २२ हजार रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

sakhee Gokhale: अभिनेत्री सखी गोखलेबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT