Bank Closed Next 4 Days  AI Image
बिझनेस

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

Bank Closed Next 4 Days Update News : आजपासून पुढील ४ दिवस बँक बंद राहणार आहे. कारण 11 सप्टेंबरला देशभरातील बँक कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. त्यामुळे शाखेतील रोख व्यवहार, चेक आणि इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • 11 सप्टेंबरला बँक कर्मचारी विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपावर जाणार

  • पाच दिवसांचा बँकिंग वर्किंग वीक लागू करणे ही कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी

  • तसेच आजपासून पुढील दिवस बँक राहणार बंद

जर आज बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते पुढे ढकलण्यापूर्वी एकदा ही बातमी नक्की वाचा. ११ सप्टेंबर म्हणजेच आज देशभरातील बँक कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनांकडून ५ दिवसांचा बँकिंग वर्किंग वीक लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे शाखेत प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच आजपासून पुढील ४ दिवस बँक बंद राहणार असल्याची माहिती आहे.

पुढील ४ दिवस बँक बंद

या संपाचा परिणाम केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाही. 11 सप्टेंबरला शुक्रवार असून त्यानंतर 12 सप्टेंबरला शनिवार आणि 13 सप्टेंबरला रविवार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बँकिंग सेवांवर सलग तीन दिवस परिणाम होऊ शकतो. याशिवाय, काही राज्यांमध्ये 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने त्या भागातील ग्राहकांना बँकेचे काम आणखी एक दिवस पुढे ढकलावे लागू शकते. त्यामुळे काही ठिकाणी बँकिंगशी संबंधित कामांसाठी तब्बल चार दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

कोणत्या बँकिंग कामांवर परिणाम होऊ शकतो?

संपाचा सर्वाधिक परिणाम बँकेच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांवर होण्याची शक्यता आहे.रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेकशी संबंधित कामकाज, बँकेत कागदपत्रे जमा करणे, खाते किंवा इतर शाखा-आधारित सेवा,बँक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्काची आवश्यकता असलेली कामे यांचा समावेश होतो. मात्र, UPI, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल सेवा शाखेतील संपामुळे आपोआप बंद होतीलच असे नाही. या सेवा स्वतंत्र डिजिटल प्रणालीवर चालतात. तरीही एखाद्या विशिष्ट बँकेची तांत्रिक अडचण किंवा सेवा-व्यवस्था वेगळी असू शकते.

SBI ने ग्राहकांना काय सांगितले?

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI नेही संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना माहिती दिली आहे. शाखा आणि कार्यालयांचे सामान्य कामकाज सुरू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे SBIच्या सर्व शाखा पूर्णपणे बंद राहतीलच असे नाही, पण ग्राहकांना नेहमीप्रमाणे सेवा मिळण्यात विलंब किंवा अडचणी येण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचाऱ्यांची काय आहे मागणी?

बँक कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी म्हणजे ‘5 डे वर्किंग’ म्हणजेच आठवड्यात फक्त पाच दिवस बँकिंग व्यवस्था लागू करणे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सुट्टी देऊन सोमवार ते शुक्रवार बँकिंग कामकाज ठेवण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून दीर्घकाळापासून केली जात आहे. या मागणीसह इतर प्रलंबित मुद्द्यांवरही कर्मचारी संघटना आणि संबंधित यंत्रणांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने संपाची हाक देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT