Bajaj Pulsar 220F returns to Indian roads with upgraded safety and modern features. saam tv
बिझनेस

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Bajaj Revives Pulsar 220F: बजाजने त्यांची आयकॉनिक पल्सर २२०एफ भारतीय बाजारपेठेत नवीन सुरक्षा अपडेट्ससह पुन्हा लाँच केली आहे.आता ही बाईक ड्युअल-चॅनेल ABS, रिफ्रेश लूक, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह बाजारात उतरलीय.

Bharat Jadhav

  • बजाज पल्सर 220F नवीन सुरक्षा अपडेट्ससह पुन्हा लाँच.

  • ड्युअल-चॅनल ABS मुळे ब्रेकिंग अधिक सुरक्षित.

  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि रिफ्रेश डिझाइनचा समावेश.

Bajaj Pulsar 220F: भारतीय तरुणांच्या पसंतीची बजाज पल्सर २२०एफ पुन्हा एकदा धमाकेदार फीचरसह बाजारात उतरलीय. २००७ पासून बाजारात असलेली ही आयकॉनिक बाईक आता बजाजने महत्त्वपूर्ण बदल करून बाजारात आणलीय. यावेळी, कंपनीने सुरक्षिततेवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. नवीन पल्सर २२०एफ आता ड्युअल-चॅनेल एबीएससह येणार आहे, ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बाईक बनलीय.

ड्युअल-चॅनेल ABS सुरक्षितता वाढवते

नवीन बजाज पल्सर 220F मध्ये सर्वात मोठा जो बदल करण्यात आलाय तो म्हणजे त्याची ड्युअल-चॅनेल ABS प्रणाली. हे फीचर्स आपत्कालीन वेळी ब्रेक लावल्यास बाईक घसरत नाही म्हणजेच काय स्लीप होत नाही. चालकाचा बाईकवरील ताबा सुटत नाही. बाईक नियंत्रित राहते. या सुरक्षा अपग्रेडसह, पल्सर २२०एफ आता ड्युअल-चॅनल एबीएस असलेली सर्वात परवडणारी पल्सर बाईक बनलीय. याच कारणामुळे प्लसर बाईक महामार्गावर चालवताना अधिक सुरक्षित वाटते, असा दावा कंपनीने केलाय.

बाईकचं रुप बदललं

सुरक्षेसह बजाज कंपनीने पल्सर २२०एफच्या लूकमध्येही थोडासा बदल केलाय. बाईकला नवीन ग्राफिक्स देण्यात आलेत. यामुळे बाईकचा स्पोर्टी स्टॅन्स आणखी वाढलाय. हे दोन नवीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात मऊ सोनेरी रंगांसह काळा बेस आणि नारंगी आणि हिरव्या रंगांसह काळा रंगात ग्राफिक्स देण्यात आले आहे.

या बदलांमुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. त्यामुळे तरुणांमध्ये या बाईकची क्रेझ अधिक वाढेल. असा दावाही कंपनीने केलाय. ही बाईक चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात Black Cherry Red, Black Ink Blue, Black Copper Beige और Green Light Copper हे रंग असतील.

कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक फीचर्स

नवीन पल्सर २२०एफ मध्ये आता ब्लूटूथ-सक्षम पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. हे फीचर्स रायडरला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि मेसेज अलर्ट आणि डीटीई (इंधन संपण्यापूर्वीचे अंतर) सारखी माहिती देत असतात. यासोबत मोबाईल चार्जिंगसाठी त्यात USB चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले आहे. यामुळे जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तरी तुमचा मोबाईल कधी डिस्चार्ज होणार नाही.

बजाजने पल्सर २२०एफ मध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीत. बाईकमध्ये अजूनही त्याच २२०सीसी, ऑइल-कूल्ड, ट्विन स्पार्क एफआय डीटीएस-आय इंजिन आहे. हे इंजिन २०.९ पीएस पॉवर आणि १८.५५ एनएम टॉर्क निर्माण करते.

ब्रेक आणि सस्पेंशन सेटअप

ब्रेकिंग बाबत ही बाईक जबरदस्त आहे. २८० मिमी फ्रंट आणि २३० मिमी रिअर डिस्क ब्रेक देण्यात आलेत. हे ड्युअल-चॅनेल एबीएससह काम करतात. सस्पेंशनसाठी समोरील बाजूस अँटी-फ्रिक्शन बुशसह टेलिस्कोपिक फोर्क्स देण्यात आली आहेत. बाईकच्या मागील बाजूस ५-वे अॅडजस्टेबल नायट्रॉक्स शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत.

हे सेटअप खडबडीत रस्त्यांवरही आरामदायी प्रवासाचा अनुभव देते. म्हणजेच काय खाचखळग्याच्या रस्त्यात जास्त धक्के तुम्हाला जाणवत नाहीत. नवीन बजाज पल्सर २२० एफ मध्ये १५ लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. बाईकचे कर्ब वेट सुमारे १६० किलोग्रॅम आहे, यामुळे ती रस्त्यावर स्थिर राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

SCROLL FOR NEXT