Sakshi Sunil Jadhav
हार्ले-डेविडसनने भारतीय बाजारात CVO स्ट्रीट ग्लाइड ही प्रीमियम टूरिंग बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने तिची एक्स-शोरूम किंमत 63.03 लाख रुपये ठेवली आहे.
लांब प्रवासाचे प्रीमियम टूरिंग अनुभव देणाऱ्या बाइक्समध्ये ही मॉडेल हार्लेच्या कस्टम व्हेईकल ऑपरेशन्सचा (CVO) खास भाग आहे. यामध्ये फीचर्स, दमदार इंजिन आणि प्रीमियम बिल्ड क्वालिटीमुळे ही बाइक बाइक लव्हर्ससाठी एक परफेक्ट ठरणार आहे.
तुम्हाला या बाईकमध्ये 1982cc मिल्वौकी-एट VVT 121 इंजिन आहे. हे इंजिन 115hp पॉवर आणि 189Nm टॉर्क जनरेट करते.
दमदार V-ट्विन इंजिनला 6-स्पीड गियरबॉक्स जोडलेला आहे. पूर्ण रेव रेंजमध्ये स्मूद आणि स्ट्राँग टॉर्कची क्षमता असलेली ही बाईक आहे.
बाईकमध्ये पुढे 47mm शोवा इनवर्टेड फोर्क्स आहे. मागे अॅडजस्टेबल सस्पेंशन आहे. त्यामुळे हायवेवर बाईक स्थिर आणि आरामदायी राइड देईल.
बाईकच्या पुढच्या बाजूला ड्युअल डिस्क ब्रेक्स आहेत. त्यामुळे ब्रेक जबरदस्त आणि सुरक्षितपणे लागतो.
बाईकमध्ये नवीन अपग्रेडेड बॅटविंग फेअरिंग आहेत. जास्तीत जास्त विंड प्रोटेक्शन आणि हायवे परफॉर्मन्ससाठी हे बेस्ट आहे.
हलके कास्ट व्हील, कस्टम-ग्रेड डिटेलिंग, ब्लॅक्ड-आउट आणि क्रोम फिनिशेसमध्ये उपलब्ध असलेली ही बाईक आहे. या सर्वामुळे स्टँडर्ड स्ट्रीट ग्लाइडपेक्षा ही आकर्षक दिसते.
हार्लेचा स्कायलाइन OS सिस्टम, नेव्हिगेशन, कनेक्टेड फीचर्स, कस्टम लेआउट इंफ्रोमेंट, दमदार ऑडिओ सिस्टम यामध्ये उपलब्ध आहे.