Sakshi Sunil Jadhav
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहून माणूस थक्क होतो. त्यामध्ये त्याची उंची, सुंदरता, रंग किंवा त्याची किंमत असते. पुढे आपण अशाच एक अद्भूत आणि अनेकांना माहित नसलेलं गुपित उलगडून सांगणार आहोत. त्याची किंमत ही जगातल्या महागड्या ऐतिहासिक वस्तूंपेक्षाही जास्त असणार आहे.
मुघल साम्राज्याची शान वाढवण्यासाठी शाहजहांने बनवलेलं 'मयूर सिंहासन' जगातील सर्वात महागडे आणि भव्य ऐतिहासिक खजिना मानला जातो. सोनं, हिरे, पाचू, माणिक आणि कोहिनूरसारख्या अनमोल रत्नांनी सजलेल्या सिंहासनाची माहिती जाणून घेऊयात.
शाहजहांनी मुघल साम्राज्याची शान आणि संपत्ती जगाला दाखवण्यासाठी हे भव्य सिंहासन तयार केले होते. याच्यावर दोन सुंदर मोर कोरले होते, ज्यामुळे याला 'मयूर सिंहासन' किंवा 'तख़्त-ए-ताउस' म्हटलं जातं.
उस्ताद साद-उल-गिलानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कारागिरांनी तब्बल ७ वर्षे मेहनत घेऊन 1635 मध्ये हे सिंहासन तयार केले आहे.
1635 मध्ये त्याची किंमत 10.70 कोटी रुपये होती. त्या काळासाठी ही रक्कम अविश्वसनीय मानली जात होती.
इतिहासकारांच्या मते, आजच्या काळात या सिंहासनाची किंमत 1.35 लाख कोटी रुपये किंवा त्याहूनही जास्त असू शकते. त्यामुळे ते जगातील सर्वात महाग ऐतिहासिक खजिना मानला जातो.
या सिंहासनावर दोन मोरांचे पंख मौल्यवान रत्नांनी सजवले होते. मध्यभागी कल्पवृक्षाची नक्षी, सुंदर स्तंभ आणि मोत्यांच्या माळांनी त्याचे सौंदर्य जास्त लखलखीत केलं.
नादिरशहाची हत्या झाल्यानंतर ईरानमध्ये अराजकता निर्माण झाली आणि मयूर सिंहासन अचानक गायब करण्यात आले. ते तोडून त्यातील रत्न वेगवेगळे विकले गेले. त्याचे काही भाग ईरानच्या 'सन थ्रोन'मध्ये जोडले गेले असावेत, असे तज्ञ मानतात.