Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्रतज्ज्ञ होते. त्यांच्या चाणक्य नितीमुळे माणसाला भविष्यात यशस्वी होण्यासाठी खूप फायदा झाला आहे. माणसाला वाईट आणि चांगले यातला फरक चाणक्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
प्रत्येक छोट्या गोष्टीवर चिडवणं, खिल्ली उडवणं हे आपल्या आयुष्यातील काही लोक काम करत असतात. अशा लोकांमुळे आत्मविश्वास ढासळतो. ऑफिसमध्येही तुमची इमेज खराब होते.
ऑफीसमध्ये स्वतःचं काम वेळेत न करता इतरांवर ढकलणारे लोक असतात. टीमचा परफॉर्मन्स खराब करून तुमच्या कामावर परिणाम करतात अशांवर कधीच विश्वास ठेवू नका.
ऑफिसचं राजकारण वाढवणारे, चुकीची माहिती पसरवून स्ट्रेस वाढवणारे लोक तुमच्याही नावाने अफवा पसरवू शकतात. अशा लोकांपासून लांब राहीलेलं योग्य आहे.
तुमच्या कामावर जळणारे, मत्सर करणारे, आणि प्रगती होऊ न देणारे मित्र किंवा लोक तुम्ही चांगलं काम केलं तरी कौतुक करत नाहीत. तुमच्या यशामुळे चिडतात. बॅकफूटवर आणण्यासाठी अडथळे निर्माण करतात.
तुमचं काम स्वतःचं म्हणून मॅनेजमेंटसमोर मांडतात. अशांमुळे तुमच्या मेहनतीला योग्य क्रेडिट मिळत नाही.
प्रत्येक गोष्टीत अडचण, दोष, अवघडपणा दाखवतात. त्यांच्या नकारात्मकतेमुळे स्वतःचा मूडही खराब होतो.
लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवणारे लोक ऑफीसमध्ये असतात. ते टीमवर्क नष्ट ठेवत आणि वातावरण बिघडवतात.
जबाबदारी घेत नाहीत, चुकांची भरपाई इतरांकडून करून घेणाऱ्या लोकांपासून लांब राहा. नाहीतर तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.