Ayushman Card  Saam Tv
बिझनेस

Ayushman Card 2024: आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी फक्त ३ कागदपत्रे आवश्यक; एकही कमी असेल तर अर्ज होईल रद्द

Ayushman Card : सरकारकडून आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड बनवलं जातं. या कार्डच्या मदतीने आपल्याला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळत असतो. जर तुम्ही कोणत्या आजारावर रुग्णालयात उपचार घेत असला तर त्याचा खर्च सरकारकडून करण्यात येतो.

Bharat Jadhav

Ayushman Card 2024 Apply Process :

लोकांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवत असते. अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना, ज्याचा लाभ लाखो भारतीय घेत आहेत. या योजनेतून देशातील अनेकजण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत. या सरकारी आरोग्य विमा योजनेंतर्गत गरीब वर्ग आणि गरजू लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. (Latest News)

ज्या व्यक्तींकडे आयुष्मान कार्ड आहे, त्या व्यक्तींना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येतो. पण हे कार्ड बनवणं सोपं नाहीये. आयुष्यमान भारतचं कार्ड बनवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असते. हे कागदपत्रे योग्य असली तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होत असतात. चला तर मग जाणून घेऊया आयुष्मान भारत योजना आणि तिच्या अर्ज प्रक्रियेबद्दल.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ लाखांपर्यंत मोफत उपचार

सरकारकडून आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आयुष्यमान कार्ड बनवलं जातं. या कार्डच्या मदतीने आपल्याला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळत असतो. जर तुम्ही कोणत्या आजारावर रुग्णालयात उपचार घेत असला तर त्याचा खर्च सरकारकडून करण्यात येतो. मात्र कार्ड बनवण्यासाठी ३ कागदपत्रे असणे आवश्यक असतात. यापैकी एकही कमी असल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

  • आधार कार्ड

  • शिधापत्रिका

  • रहिवाशी पुरावा

यासह अर्जदाराकडे एक सक्रिय फोन नंबर देखील असणे आवश्यक आहे. या चार कागदपत्रांपैकी कोणतेही एक गहाळ असल्यास तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असाल आणि तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील, तर तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्ही ABHA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT