Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat Yojana : तब्बल ५ लाखापर्यंत मोफत उपचार; पण अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर!

Ayushman Bharat Yojana Application Process : केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेत तुम्हाला ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकदेखील मोफत उपचार घेऊ शकणार आहेत.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. यासाठी आयुष्मान कार्ड बनवावे लागते. आयुष्मान कार्ड तुम्ही तयार करण्याची प्रोसेस काय ते जाणून घेऊया.

आयुष्मान योजनेच्या नियम व अटी

देशभरातली अनेक नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत ३४.७ कोटी लोकांनी या योजनेत अर्ज केले आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचे वैद्यकीय कव्हरेज मिळते. आयुष्मान भारत योजनेत सर्व वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.जर तुम्ही इतर कोणत्याही प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्सचा लाभ घेत असाल तरीही या योजनेअंतर्गत ५ लाखांचे कव्हरेज मिळवू शकतात.

आयुष्मान भारत योजनेत अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारतच्या अधिकृत वेबसाइट https://abdm.gov.in वर जावे लागेल.

  • तिथे ज्या व्यक्तीला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड PMJAY कियोस्कवर वेरिफाय करावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.

  • यामध्ये तुम्ही AB-PMJAY आयडीसह तुमचे ई-कार्ड प्रिंट करु शकतात.

एकाच कुटुंबातील किती लोक आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात?

आयुष्मान भारत योजनेत एकाच कुटुंबातील किती लोक लाभ घेऊ शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आयुष्मान भारत योजनेत एकाच कुटुंबातील सर्व सदस्यदेखील लाभ घेऊ शकतात. ज्या लोकांना खरंच गरज आहे ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT