देशातील वाढत्या मेडिकल खर्चामध्ये मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची योजना आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आता अधिक मजबूत करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस हेल्थ कव्हर मिळत होते. मात्र आता काही ठराविक कुटुंबांना एकूण 10 लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च मिळणार आहे.
सर्वात खास बाब म्हणजे हा लाभ फक्त त्या कुटुंबांना मिळेल ज्यांच्याकडे एक महत्वाची पात्रता आहे. त्यामुळे या नव्या अपडेटमुळे लाखो कुटुंबांना दुप्पट संरक्षण मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.
आयुष्मान भारत योजना म्हणजे काय?
आयुष्मान भारत–PMJAY ही केंद्र सरकारची सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या अंतर्गत गरीब, दुर्बल आणि गरजू कुटुंबांना महागड्या उपचारांचा खर्च उचलणारा आरोग्य कव्हर दिला जातो. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असते. देशभरातील हजारो हॉस्पिटल्समध्ये ही योजना लागू आहे. यात मोठ्या शस्त्रक्रिया, गंभीर आजार, सेकंडरी आणि टर्शियरी ट्रीटमेंट तसेच पूर्वीपासून असलेल्या आजारांचाही समावेश आहे.
कुटुंबातील कोणते सदस्य येतात कव्हरमध्ये?
या योजनेत कुटुंबाची व्याख्या मोठी आहे. पती-पत्नी, मुले, पालक, आजोबा-आज्जी, सासू-सासरे, भाऊ-बहिणी आणि कुटुंबासोबत राहणारे इतर आश्रित सदस्य यांचा यामध्ये समावेश होतो. सदस्यसंख्येवर किंवा वयावर कोणतीही मर्यादा नाही.
70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी अतिरिक्त लाभ
सरकारने गेल्या वर्षी एक मोठा बदल केला. जर कुटुंबातील एखादा सदस्य 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असेल, तर त्या व्यक्तीसाठी वेगळा 5 लाख रुपयांचा अतिरिक्त टॉप-अप दिला जाईल. म्हणजेच अशा कुटुंबासाठी एकूण आरोग्य कव्हर 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
हा फायदा मिळण्यासाठी काय अट आहे?
अट अतिशय सोपी आहे. व्यक्तीचे वय किमान 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. वयाचा पुरावा आधार कार्डवरून घेतला जाईल. पात्र व्यक्तीला आपले Aadhaar eKYC पुन्हा करून घ्यावे लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे इतर फायदे
या योजनेत वयोमर्यादा नाही, त्यामुळे 80 वर्षांपेक्षा जास्त वयातही योजना लागू होते. वार्षिक हेल्थ चेकअप मोफत मिळतो. शस्त्रक्रिया, स्पेशलिस्ट उपचार, ऑर्गन ट्रान्सप्लांटसारख्या महागड्या उपचारांचाही कव्हर यामध्ये उपलब्ध आहे. सरकारच्या या अपग्रेडमुळे लाखो कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून महागड्या उपचारांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.