Ayushman card is lost, free hospital treatment is possible under the scheme saam tv
बिझनेस

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Ayushman Health Card Lost: आयुष्मान कार्ड हरवले तरी रुग्णालयात मोफत उपचार घेता येतात. यासाठी काय प्रक्रिया असेल ते जाणून घ्या. कोणते कागदपत्र आवश्यक असेल.

Bharat Jadhav

  • आयुष्मान कार्ड हरवलं तरी मोफत उपचार घेता येतात.

  • आधार कार्डसारख्या ओळखपत्रावर उपचार सुरू होतात.

  • डुप्लिकेट कार्ड मिळवण्यासाठी CSC केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

  • आवश्यक कागदपत्रे असल्यास रुग्णालयात कोणतीही अडचण येत नाही.

भारत सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना राबवते असते. वेगवेगळ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. देशातील गरीब आणि गरजू लोकांना मोफत उपचारांचा लाभ देखील सरकारच्या योजनेत घेता येतात. यासाठी सरकार मोफत उपचारांसाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना चालवते. या योजनेअंतर्गत लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.

या योजनेतून लाभ घेणाऱ्यांना आयुष्मान कार्ड देखील दिले जातात. योजनेअंतर्गत सूचीबद्ध खासगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचार पुरवले जातात. पण बऱ्याचदा अनेकांकडून आयुष्मान कार्ड हरवत असते. अशा परिस्थितीत लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्नही येतो की जर आयुष्मान कार्ड हरवले तर आपल्याला मोफत उपचार मिळू शकतात का?

तुमचे आयुष्मान कार्ड हरवले तरीही तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात. यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागले. ते पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे जाणून घेऊ. जर आयुष्मान कार्ड हरवले असेल, तर तुम्ही रुग्णालयात पोहोचल्यावर तुमचे नाव आणि ओळख तपासण्याचे इतर मार्ग आहेत.

उपचारांसाठी, रुग्णालयाने तुम्ही पात्र आहात हे सिद्ध करणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही आयुष्मान मित्राकडे जाऊन तुमचे आधार कार्ड किंवा कोणतेही वैध सरकारी ओळखपत्र दाखवू शकता. रुग्णालय तुमचे नाव ऑनलाइन सिस्टीममध्ये आहे का हे तपासते. तुमचा या योजनेत समावेश आहे की नाही हे तपासले जाते. यानंतर तुम्ही मोफत उपचारांची सुविधा घेऊ शकता.

जर तुम्हाला आयुष्मान कार्ड हरवल्यानंतर पुन्हा मिळवायचे असेल, तर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा जनसेवा केंद्रात जाऊ शकता. तिथे आधार आणि मोबाईल नंबरवरून तुमची माहिती मिळवली जाते, त्यानंतर आयुष्यमान कार्डची नवी प्रिंट काढून दिली जाते.

आयुष्मान कार्ड हरवलं तर उपचार घेता येतात का?

होय, आयुष्मान कार्ड हरवलं तरी रुग्णालयात मोफत उपचार घेता येतात.

कार्ड हरवल्यास काय करावं?

कार्ड हरवल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य ओळखपत्र वापरून उपचार घेता येतो.

डुप्लिकेट आयुष्मान कार्ड कसं मिळवता येईल?

आयुष्मान भारताच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या CSC केंद्रात अर्ज करून डुप्लिकेट कार्ड मिळवता येतं.

कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

आधार कार्ड, कुटुंब ओळखपत्र, आणि रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT