Atal Pension Yojana Saam Tv
बिझनेस

Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

Atal Pension Yojana After Retirement Plan: अटल पेन्शन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील नागरिकांना निवृत्तीनंतर मासिक वेतन मिळते. या योजनेअंतर्गत रोज फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकतात. अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीची योजना आहे. या योजनेत नागरिकांना त्यांच्या भविष्यात निश्चित उत्पन्न मिळते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना १८ वर्षांपासून पैसे गुंतवायचे असतात.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत जर तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षांपासून २१० रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर ६० वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपये मिळतात. वार्षिक ६०,००० रुपये उत्पन्न मिळते. महिन्याला २१० रुपये म्हणजेच प्रत्येक दिवशी तुम्हाला ७ रुपयांची बचत करावी लागणार आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला ६० वर्षानंतर दर महिन्याला १,००० ते ५,००० रुपये पेन्शन मिळू शकते. तुमच्या गुंतवणूकीवर ही पेन्शनची रक्कम अवलंबून असते. तुम्ही तर दर महिन्याला ४२ रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला १००० रुपयांची पेन्शन मिळेल. त्याचप्रमाण तर तुम्ही २१० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ५००० रुपयांची पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही तीन महिन्यांनीदेखील गुंतवणूक करु शकतात. त्यामुळे तुम्हाला तीन महिन्यांनी ६२६ रुपये भरावे लागणार आहे. जर तुम्ही ६ महिन्यांनी गुंतवणूक केली तर तुम्हाला १,२३९ रुपये योगदान द्यावे लागणार आहे. या योजनेत तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शची हमी दिली जाते. असंघटित क्षेत्रातील उमेदवारांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित रक्कम मिळवी, या उद्देशाने नागरिकांना पैसे मिळणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नागरिकांना पैशाची चिंता भासणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT