Pension Scheme Saam Tv
बिझनेस

Pension Scheme: भारी नाही तर जबरदस्त आहे 'ही' योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

APY Pension Scheme: भारी नाही तर जबरदस्त आहे 'ही' योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

Satish Kengar

APY Pension Scheme:

आपले म्हातारपण कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आरामात पार पडावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक लोक आपल्या कमाईतून बचतही करतात. वृद्धापकाळात आर्थिक आधारासाठी पेन्शन खूप महत्वाची आहे. मात्र जेव्हा तुम्ही बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवतात, तेव्हाच तुम्हाला योग्य परतावाही मिळतो.

जेव्हा शरीर तुम्हाला साथ देत नाही आणि तुम्हाला आवश्यक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते, तेव्हा पेन्शन तुमच्या सर्व समस्यांवर उपाय ठरू शकते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकता आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

एपीवाय (APY) योजनेतील गुंतवणुकीवर मिळणार पेन्शन

अटल पेन्शन योजनेमुळे तुम्हाला वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळू शकतो. ही एक पेन्शन योजना असून सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करून गुंतवणूक करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल

या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तरीही त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळू लागेल. पेन्शनची गणना समजून घेण्यासाठी, समजा तुमचे वय १८ वर्षे आहे, तर या योजनेत दरमहा २१० रुपये जमा करून, म्हणजे फक्त ७ रुपये प्रतिदिन, तुम्हाला ६० नंतर दरमहा ५००० रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला 1,००० रुपये पेन्शन हवी असेल तर या वयात तुम्हाला दरमहा फक्त ४२ रुपये जमा करावे लागतील.

दरम्यान, अटल पेन्शन योजनेत सामील होऊन, पती-पत्नी दोघेही दरमहा १०,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. तसेच जर पतीचा ६० वर्षापूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल. पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला संपूर्ण पैसे परत मिळतील. अटल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून खूप लोकप्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT